Jammu-Kashmir : सैन्य ॲक्शनमोडमध्ये, राजौरीत पॅरा स्पेशल फोर्सच्या 9 जवानांसह सुरक्षा दलाचे संयुक्त ऑपरेशन

Jammu Kashmir News
Jammu Kashmir News
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Jammu-Kashmir : जम्मू काश्मीरच्या राजौरी येथील जंगलात तीन दिवसांपसून सुरक्षा दल आणि पॅरा स्पेशल फोर्सच्या जवान यांची दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे. या दरम्यान काल शुक्रवारी लष्कराचे पॅरा एसएफचे 5 जवान शहीद झाले. त्यानंतर जम्मूत सैन्य मोठ्या प्रमाणात अॅक्शनमोडमध्ये आले आहे. राजौरी आणि बारामुल्ला भागात पॅरा स्पेशल फोर्सच्या 9 जवानांसह सुरक्षा दलाचे संयुक्त ऑपरेशन सुरू आहे. यामध्ये एक दहशतवादी ठार झाला तर आणखी एक जखमी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Jammu-Kashmir : राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांचा दौरा

राजौरी येथे झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज (दि.६) जम्मू सेक्टरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जम्मूला भेट देणार आहेत. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे हे देखील सिंह यांच्यासोबत जम्मूला भेट देऊन सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. उत्तर लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हेही दौऱ्यावर आहेत.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news