जम्मू आणि काश्मीरमध्ये ‘LET’शी संबंधित ४ दहशतवाद्यांना अटक

जम्मू आणि काश्मीरमध्ये ‘LET’शी संबंधित ४ दहशतवाद्यांना अटक
Published on
Updated on

 पुढारी ऑनलाईन : जम्मू आणि काश्मीरच्या बडगाममध्ये पोलिसांनी प्रतिबंधित दहशतवादी संघटना एलईटीशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडुन काही साहित्य जप्त केले आहे. मुश्ताक अहमद लोन, अझहर अहमद मीर, इरफान अहमद सोफी आणि अबरार अहमद मलिक अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची  नावे आहेत. जप्त केलेले सर्व साहित्य पुढील तपासासाठी केस रेकॉर्डमध्ये घेण्यात आले आहे. अशी माहिती जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिली आहे.

Jammu and Kashmir : चार दहशतवाद्यांचा खात्मा

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील पुंछमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या मोठ्या कारवाईत चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. पुंछमधील सिंधरा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये ही चकमक झाली, अशी माहिती भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.१७) दिली. भारतीय लष्कराची विशेष दले, राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिस आणि इतर दलांनी ही संयुक्त कारवाई पुंछच्या सिंधरा भागात केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news