जळगाव : भुसावळात 12 हजारांची लाच घेताना कोतवालासह एकजण जाळ्यात

File Photo
File Photo

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

सातबारा उतार्‍यावर नोंद करण्यासाठी मंडळाधिकार्‍यांच्या नावाने 12 हजारांची लाच मागून ती स्विकारणार्‍या खाजगी साथीदारासह कोतवालाला जळगाव एसीबीच्या पथकाने मंगळवारी (दि 18) दुपारी 1 वाजता अटक केली आहे. रवींद्र धांडे असे अटकेतील कोतवालाचे नाव आहे. जळगाव एसीबीचे निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला.

भुसावळ तालुक्यातील कुर्‍हेपानाचे भागातील तक्रारदाराने या संदर्भात एसीबीकडे तक्रार दिली होती. शेतीची नोंद सातबारा उतार्‍यावर घेण्यासाठी त्यांनी मंडळाधिकार्‍यांची भेट घेतल्यानंतर कोतवालांना भेटण्यास सांगितल्यानंतर रवींद्र धांडे यांनी 12 हजारांची लाच मागितली. मात्र तक्रारदाराने याबाबत एसीबीला त्वरीत कळविल्यानंतर एसीबीने तक्रार नोंदवून सापळा रचला. त्यानुसार मंगळवारी (दि.18) दुपारी कोतवालाने खाजगी साथीदाराकडे लाच देण्याचा इशारा केल्यानंतर दोघांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्‍यांनी ही कारवाई केली. एसीबीच्या कारवाईनंतर तहसील कार्यालयात प्रचंड खळबळ उडाली.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news