Jalgaon News : पाण्यासाठी रक्ताने लिहिले पत्र, शेतकरीपुत्राचे मुख्यमंत्र्यांना अनोखे साकडे

Jalgaon News : पाण्यासाठी रक्ताने लिहिले पत्र, शेतकरीपुत्राचे मुख्यमंत्र्यांना अनोखे साकडे

जळगांव : पुढारी वृत्तसेवा, जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील पाडळसरे धरणामुळे तापी नदीच्या काठावरील शेतकऱ्यांच्या शेतात पर्यंत पाणी जाणार यामुळे या परिसरातील शेती सुजलाम सुफलाम होणार आहे. मात्र या धरणाचे काम अजूनही पूर्ण होत नसल्याने चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील शेतकरी पुत्राने रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हे धरण पूर्ण करावे अशी मागणी केली आहे. (Jalgaon News)

संबधित बातम्या :

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील पाडळसरे धरण पूर्ण करावे या मागणीसाठी तरुणाने मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहले आहे. चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील शेतकरी पुत्र उर्वेश साळुंखेनी पाडळसरे धरण पूर्ण करण्बायाबत मुख्यमंत्र्यांना रक्ताच्या शाईने पत्र लिहले आहे. गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून धरणाचे काम अपूर्ण आहे. हे धरण राज्य सरकारने व केंद्र सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावे, धरण पूर्ण झाल्यास किमान जळगाव जिल्ह्यातील पाच ते सहा तालुक्यातील शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तरी शेतकरी बांधवांचा विचार करून राज्य सरकारी व केंद्र सरकारने हे धरण कसे पूर्ण होईल असे लवकरात लवकर प्रयत्न करावे. अशी मागणी रक्ताने लीहालेल्या निवेदनात केली आहे. येत्या 20 ते 25 दिवसात उर्वेशला मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्यास 26 व्या दिवशी मंत्रालयात उडी घेणार असल्याचा इशारा देखील साळुंखे यांनी दिला आहे. (Jalgaon News)

धरणाची जमिनीपासून दोन मीटर उंची वाढणार असल्याने बॅकवॉटर ३५ किलोमीटर नांदेड या गावापर्यंत जाणार आहे. तापी काठावरील ४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे तर अमळनेर शहराचा पाणी प्रश्न सुटणार आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news