Jalgaon fraud News : गुंतवणूकीचे आमिष दाखवत डॉक्टरची फसवणूक

Jalgaon fraud News : गुंतवणूकीचे आमिष दाखवत डॉक्टरची फसवणूक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत वाढीव मोबदला देण्याचे आमिष दाखवीत सिंधी कॉलनीतील उदासी हॉस्पिटलच्या डॉक्टरची तब्बल ७ लाख ४७ हजार रुपयामध्ये दोन अज्ञात व्यक्तींनी ऑनलाईन फसवणूक केली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सिंधी कॉलनीतील डॉ. उदासी हॉस्पिटलमधील डॉ. चंदरलाल प्रभुदास उदासी (७०, रा. सिंधी कॉलनी, जळगाव) यांच्यासोबत दोन जणांनी दि. २८ डिसेंबर २०२३ ते ३ फेब्रुवारी २०२४ संपर्क साधला. व 'ट्रे़डिंग इन्व्हेसमेंट'च्या नावाखाली मोबदला देण्याचे सागितले. त्यानुसार डॉ. चंदरलाल उदासी हे गुंतवणूक करत गेले. वेळोवेळी त्यांनी एकुण ७ लाख ४७ हजार रुपये गुंतवणूक केली. परंतू त्यांना गुतवणूक केल्याच्या मोबदल्यात कोणतीही रक्कम मिळाली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. उदासी यांनी दि. ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून इक्षीत व समीर शर्मा नाव असणाऱ्या दोन जणांविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील करत आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news