जळगाव : रातोरात श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी हमाली काम करणाऱ्या तरुणाने घरातच नोटा छापण्याचा कारखाना उघडला. युट्युबवर व्हिडिओ पाहून घरीच नकली नोटा छापल्या. नोटा चालविण्यासाठी ५० हजारात दीड लाखाच्या नोटा देणाऱ्यास पोलिसांनी अटक केली. पथकाने त्याच्याकडून १ लाख ६८ हजार ९०० रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, संशयित आरोपी देविदास पुंडलिक आढाव (वय-३०, रा. कुसुंबा, जि. जळगाव) हा नकली नोटा तयार करून ते बाजारात वापर करत असल्याची गोपनीय माहिती विभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी संशयित आरोपीला पकडण्याच्या सूचना दिल्या. सूचनेप्रमाणे रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, चंद्रकांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव, सचिन साळुंखे यांनी कारवाई केली.
बेळगाव – शॉर्टसर्किटमुळे किराणा दुकानासह गॅरेजला आग
—–
एमआयडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
एमआयडीसीच्या व्ही सेक्टरमध्ये सापळा रचून नकली नोटा वापरात बाजारात देत असल्याची खात्रीलायक सूचना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. ५० हजारात दीड लाखांच्या बनावट नोटा देण्याचा हिशोब ठरला होता. पोलिसांनी त्याला तीन लाखांच्या नोटांची मागणी केली. आढावने बोलविलेल्या ठिकाणी पोलिस तेथे जाऊन नोटा जप्त करत त्याला ताब्यात घेतले. पथकाने आढाव यांच्याकडून १००, २०० आणि ५०० च्या १ लाख ६८ हजार ९०० रुपयांच्या नकली नोटा व त्याच्या घरून प्रिंटर, रंग आणि नोटा छपाईचे कागद हस्तगत केले. त्याची चौकशी केली असता युट्युबवर नोटा छापण्याचे पाहून या नकली नोटा छापल्या आहे, असे त्याने सांगितले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
हेही वाचा :