बेळगाव
बेळगाव
बेळगाव – शॉर्टसर्किटमुळे किराणा दुकानासह गॅरेजला आग
बेळगाव – पुढारी वृत्तसेवा – शॉर्टसर्किटमुळे एका किराणी दुकानासह टू व्हीलर गॅरेज आगीच्या भक्षस्थानी पडून हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना विजयनगर तारिहाळ रोड हलगा येथे काल रात्री घडली. विजयनगर तारिहाळ रोड हलगा येथील एका किराणा दुकानासह त्याच्या शेजारी असलेल्या टू व्हीलर गॅरेजला काल बुधवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागली.
हा प्रकार आसपासच्या लोकांना समजेपर्यंत वाऱ्यामुळे आगीचा भडका उडवून किराणा दुकानातील साहित्य जळून बेचिराख झाले. त्याचप्रमाणे टू व्हीलर गॅरेजचे देखील नुकसान झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत हजारो रुपयांचे नुकसान झाले होते.

