जळगाव : भुसावळ येथील बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यास इंग्रजीचा पेपर अवघड गेल्याने त्याने घरात गळफास घेऊन आपले जीवन संपविले.
भुसावळ शहरातील समृध्दी पार्क येथे इदांत पंकज मंडेलेचा (वय १७) हा मुलगा आपल्या कुटुंबीयासह वास्तव्याला होता. तो यावर्षी बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. काही दिवसांपासून बारावीची परीक्षा सुरू आहे. यामध्ये इदांत मंडले याने देखील परिक्षा देण्याची तयारी केली होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याने बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर दिला होता. परंतु हा पेपर त्याला अवघड गेल्याने तो काही दिवसांपासून नैराश्येत होता.
दरम्यान त्याने मंगळवारी (दि. २७) राहत्या घरात कोणीही नसताना छताच्या पंख्याला दोरीने गळफास घेवून जीवन संपविले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. या घटनेबाबत रात्री भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश चौधरी हे करीत आहे.
हेही वाचा :