पुढारी ऑनलाईन डेस्क : जी-20 परिषदेनिमित्त केंद्र सरकारने डिनरच्या निमंत्रणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 'भारताचे राष्ट्रपती' असे संबोधिले आहे. यामुळे देशभरात आता इंडिया विरुद्ध भारत हा मुद्दा चर्चेत आला आहे.यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी मोठे विधान केले आहे. इंडियाला भारत म्हणण्यास घटनात्मक आक्षेप नाही; पण 'इंडिया' नाव पूर्णपणे सोडून देण्याइतके सरकार मूर्ख ठरणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
शशी थरुर यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी इंडिया या नावावर आक्षेप घेतला होता. कारण आपला देश ब्रिटिश राजवटीचे उत्तराधिकारी राष्ट्र आहे आणि पाकिस्तान हे वेगळे राष्ट्र आहे.
शशी थरूर यांनी सोशल साइट X वर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, देशाच्या दोन अधिकृत नावांपैकी एक असलेल्या इंडियाला 'भारत' म्हणण्यास घटनात्मक आक्षेप नाही. मला आशा आहे की, अनेक शतके प्रचंड ब्रँड व्हॅल्यू असलेले 'इंडिया' हे नाव पूर्णपणे काढून टाकण्याइतके सरकार मूर्ख ठरणार नाही. इतिहासाचे पुनरुज्जीवन करणाऱ्या आणि जगभरात ओळखल्या जाणाऱ्या नावावर आपला हक्क सोडण्याऐवजी आपण दोन्ही शब्द वापरत राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
हेही वाचा :