पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) शेवटचा चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' जो बॉक्स ऑफिसवर सटकून आपटला. यानंतर आमिरने चित्रपटांतून ब्रेक घेतला होता. आता एक नवी माहिती समोर आलीय. बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्टनिस्ट' आमिरने साऊथ चित्रपटांकडे मोर्चा वळवल्याची चर्चा आहे. (Aamir Khan)
आमिर खान दीर्घकाळ मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मागील वर्षी 'लाल सिंह चड्ढा'मध्ये तो दिसला होता. या चित्रपटाच्या बॉयकॉटची मागणी देखील झाली होती. हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानने साऊथ चित्रपट इंडस्ट्रीकडे मोर्चा वळवल्याचे म्हटले जात आहे.
रिपोर्टनुसार, आमिर लवकरच साऊथ इंडियन चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'केजीएफ चॅप्टर १' आणि २ चे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी आपल्या चित्रपटात ज्युनियर एनटीआरसोबत बॉलीवूड सुपरस्टार आमिर खानला घेण्याची योजना बनवली आहे. नील यांच्या जवळच्या मित्रांनी ही माहिती दिल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
मात्र याबाबत आमिर खानकडून कोणतेही स्टेटमेंट समोर आलेले नाही. पण, प्रशांत नील आणि ज्युनिअर एनटीआरने आधीपासूनच आपल्या प्रोजेक्टची घोषणा केलीय. प्रशांत नील यांच्या एका जवळच्या सूत्राने सांगितले की, प्रशांत नील आणि ज्यु. एनटीआर आमिर खानला घेऊन चित्रपट बनवणार आहेत. प्रशांत नील सध्या 'सालार' चित्रपटामुळे बिझी आहेत. यामध्ये अभिनेता प्रभास आहे. या चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर ते नव्या प्रोजेक्टवर काम करणार आहेत. रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे शूटिंग २०२३ मध्ये सुरू होणार आहे.
आमिर खानचा चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' यावर्षी ११ ऑगस्ट रोजी रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काही खास कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटामध्ये आमिरसोबत करीना कपूर खान मुख्य भूमिकेत होती.