वॉशिंग्टन : हरवलेली अंगठी दीर्घकाळानंतर सापडल्याच्या काही घटना पाश्चात्त्य देशांमध्ये घडलेल्या आहेत. आता अशीच एक घटना अमेरिकेत घडली आहे. या जोडप्याची ही रंजक कहाणी इंटरनेटवरही व्हायरल झाली आहे. फ्लोरिडात राहणार्या निकने त्याची पत्नी शायनाला हिर्याची अंगठी (Engagement ring) देऊन प्रपोज केले होते. मात्र, काही दिवसांनी ती अंगठी टॉयलेटच्या एका पाईपलाईनमध्ये हरवली होती. 21 वर्षांपूर्वी शायनाच्या आईच्या घरी असलेल्या टॉयलेटमध्ये ही अंगठी हरवली होती. त्यावेळी निक आणि शायनाने अंगठी शोधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना अंगठी शोधण्यात यश आले नाही. आता ही अंगठी सापडली आहे!
दोन दशकानंतर आता नोव्हेंबर महिन्यात निकच्या आईने टॉयलेटचे बांधकाम करण्यासाठी एका प्लंबरला सांगितले. त्यानंतर बांधकाम करताना प्लंबरला टॉयलेटमध्ये अडकलेली अंगठी सापडली. हा प्लंबर टॉयलेटचे बांधकाम करत असताना हरवलेली अंगठी (Engagement ring) त्याला सापडली. त्यानंतर प्लंबरने अंगठी सापडल्याचे शायनाची आई रेनीला सांगितले.
त्यावेळी सापडलेली अंगठी शायनाची असल्याचे रेनीच्या लक्षात आले आणि तिने निक आणि शायनाला सरप्राईज द्यायचे ठरवले. त्यानंतर रेनीने दोघांनाही ख्रिसमस स्पेशल डेसाठी विशेष गिफ्ट द्यायचे ठरवले. निक आणि शायना ख्रिसमस पार्टीसाठी रेनीच्या घरी आल्यानंतर एका ख्रिसमस बॉक्समध्ये ठेवलेली अंगठी (Engagement ring) त्यांना रेनीने दिली. अंगठी पाहून निक आणि शायनाला आश्चर्याचा धक्का बसला.
निकने अंगठी सापडल्यावर म्हटले, आईने एका छोट्या ख्रिसमस बॅगमध्ये अंगठी ठेवली होती. आम्ही ती बॅग उघडल्यानंतर अंगठी सापडल्याचा आमचा आनंद द्विगुणीत झाला. शायनाने ती अगंठी तिची असल्याचे ओळखले. (Engagement ring) अंगठी पुन्हा भेटल्याने तिचेही डोळे पाणावले. आता आम्ही या अंगठीचा नवीन अलंकारामध्ये समावेश करणार आहोत. इतक्या वर्षानंतर अंगठी सापडल्याचा आनंद झालाच; पण या घटनेतून आम्ही खूप मोठा बोध घेणार आहोत. जेव्ही तुम्ही काही गोष्टी हरवता त्यावेळी टॉयलेटमध्ये जाऊन कानकोपर्यात त्यांना शोधण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा.
हेही वाचा :