पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत अभिनेत्री उर्फी जावेदला (Urfi Javed) बेड्या ठोकण्याची मागणी केलीय. त्यांनी ट्विट करत मुंबई पोलिसांकडे ही मागणी केलीय. (Urfi Javed) त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय- शी…ऽऽऽऽ अरे..हे काय चाललयं मुंबईत रस्त्यांवर सार्वजनिक ठीकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला @MumbaiPolice IPC/CRPC आहेत की नाही, तात्काळ बेड्या ठोका हीला, एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये @CPMumbaiPolice.
उर्फी तिच्या विचित्र आणि अतरंगी फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. तिची फॅशन हॉलवूडच्या फॅशन तज्ज्ञांपर्यंतही पोहोचली आहे. दरम्यान, ती बॅकलेस फोटो असलेला ड्रेस परिधान करून रेस्टॉरेंटमध्ये गेली होती. तिथे तिच्या एकापेक्षा एक हॉट पोझ कॅमेराबद्ध झाल्या होत्या. दरम्यान, ती विचित्र कपडे परिधान करून रस्त्यावर उतरली. तिचा एक निळ्या गाडीतून उतरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या लूकमध्ये ती ब्लॅक कलरच्या लॉन्ग स्कर्टमध्ये दिसतेय. त्यावर तिने ऑफ शोल्डर टॉप घातलाय, जो खूप विचित्र स्टाईल असलेला दिसतो आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर उर्फीची जोरदार चर्चा सुरु झाली. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी उर्फीवर जोरदार निशाणा साला. नग्नता आणि विकृती पसरवल्याप्रकरणी उर्फीला बेड्या ठोका, अशी मागणी त्यांनी ट्विटच्या माध्यमातून मुंबई पोलिसांकडे केली आहे.
चित्रा वाघ यांच्या ट्विटनंतर अनेक ट्विटर युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिलं की, 'बरोबर ताई अशा मुलींना काही वाटतं की, नाही. आम्हाला बघायला पण लाज वाटत आहे. ही रस्त्यावर उभी आहे.'
दुसऱ्या युझरने लिहिलं, 'या बाईला रोखायला हवं पण त्याच्यापेक्षा फॅशन डिझायनरवर कठोर कारवाई करायची गरज आहे.'