Bengaluru IT employee thief | कोरोनाकाळात नोकरी गमावली अन् IT कर्मचारी बनली चोर

IT employee thief
IT employee thief

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोना काळात अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरी गमवावी लागली. दरम्यानच्या काळात नोएडामधून बंगळूरमध्ये नोकरीसाठी आलेल्या जस्सी अग्रवाल हिचीदेखील नोकरी गेली. त्यानंतर चक्क 'ती' २६ वर्षीय IT कर्मचारी युवती अट्टल चोर बनली. या संदर्भात वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. (Bengaluru IT employee thief)

कोरोना काळात नोकरी गेल्यानंतर बंगळूरमधील आयटी कर्मचारी जस्सी हिने PGs (पीजी) निवासस्थानातून लॅपटॉप आणि गॅझेट चोरण्यास सुरुवात केली. ती कोणी नसलेल्या खोल्यांमध्ये प्रवेश करत असे आणि चार्जिंगसाठी राहिलेले लॅपटॉप उचलत असे. त्यानंतर चोरी केलेले गॅझेट्स ती गावी येऊन ते काळ्या बाजारात विकत होती. (IT employee thief)

जेव्हा एका पीजी रहिवाशाची पोलिसांकडे तक्रार आली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. संबंधित व्यक्तीने PGs (पीजी) निवासस्थानातून अनेक लॅपटॉप गहाळ झाल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी २६ मार्च रोजी जसीला अटक केली आणि त्याच्याकडून १०-१५ लाख रुपयांचे २४ लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. (Bengaluru IT employee thief)

संबंधित संशयित गुन्हेगार असलेली आयटी कर्मचारी जस्सी हेच अनेक ठिकाणी करत आहे. गेल्या काही काळापासून ती अशाप्रकारच्या चोऱ्या करत आहे. आमच्या क्राइम ब्रँचने बंगळूमधीर पीजीमध्ये प्रवेश केला. तपासादरम्यान जेस्सी चोरीच्या गॅजेट्ससह परततानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाल्याचे' एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे, असेदेखील वृत्तात म्हटले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news