Movie Crew Review : चोरी-दिवाळखोरी अन् मौजमस्तीनं भरलेला तब्बू ,क्रितीचा आला ‘क्रू’; पाहा रिव्ह्यू

Movie Crew Review
Movie Crew Review
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनॉन यांचा 'क्रू' हा चित्रपट सिनेमा गृहात आज शुक्रवारी (दि.२९) रोजी रिलीज झाला आहे. या चित्रपटात धमाकेदार अॅक्शन सीनसह मोजमस्ती, प्रेम, भारदस्त संवाद कौशल्य दाखवण्यात आलं आहे. तब्बू, करीना कपूर आणि क्रितीसोबत चित्रपटात दिलजीत दोसांझ, राजेश शर्मा, शाश्वत चटर्जी आणि कपिल शर्मा यांचाही समावेश आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश कृष्णन यांनी केलं आहे. सकाळपासून चित्रपट पाहणाऱ्याची गर्दी थिअटरमध्ये दिसून आली आहे. यानंतर चित्रपटाबद्दल नेटकऱ्यांकडून आता वेगवेगळे रिव्ह्यू समोर येत आहेत. ( Movie Crew Review )

संबंधित बातम्या 

'क्रू' चित्रपटाची स्टोरी

चित्रपटाची कथा अभिनेत्री तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनॉन या तिघीची आहे. गीता सेठी (तब्बू), जास्मिन कोहली (करीना कपूर) आणि दिव्या राणा (क्रिती सेनॉन). हे तिघेही विजय वालिया यांच्या (सास्वता चॅटर्जी) कोहिनूर एअरलाइन्समध्ये काम करतात. आणि जीवनात स्वतःच्या आर्थिक समस्यांना तोंड देत असतात. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या विमान कंपनीत या तिघीजणी काम करत असतात. परंतु, त्याच्या अपेक्षा खूपच मोठ्या असतात. अचानक त्याच्या जवळ एक असा दिवस येतो की, एक चुक केल्याने संपूर्ण आयुष्य बदलणार असते. मग त्या काय निर्णय घेतात? आणि या परिस्थितीचा कसा सामना करतात? हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

एक ज्येष्ठ व्यक्ती राजवंशी (रमाकांत दायमा) विमानात मरण पावतो आणि ड्युटीवर असताना या तिघांना त्यांच्या मृतदेहावर सोन्याची बिस्किटे सापडतात. ती बिस्किटे पाहून त्यांना ती चोरण्याचा मोह होतो, पण त्या काही चोरत नाही. नंतर, जेव्हा त्यांना कळते की, त्यांची एअरलाइन दिवाळखोरीत आहे आणि विजय वालिया परदेशात पळून गेला आहे. यानंतर पोलिसांची एक टिम तपास करताना दिसत आहे.

नेटकऱ्यांकडून वेगवेगळे रिव्ह्यू

आज सकाळपासूनच 'क्रू' चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली आहे. दरम्यान अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या आपआपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. यात काहींनी चित्रपटाचा सुरूवातीचा भाग आवडला असून नंतरचा भाग आवडला नसल्याचे म्हटलं आहे. पण दिग्दर्शकाने त्याचे खरे कौशल्य चित्रपटाच्या उत्तरार्धात दाखविले आहे, परंतु, शेवट चांगला नाही असेही म्हटले आहे. यावरून चाहत्यांनी चित्रपटाविषयी संमिश्र प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. ( Movie Crew Review )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news