२०२४ असणार ‘गगनयान’ वर्ष : इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ

२०२४ असणार ‘गगनयान’ वर्ष : इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आज (दि.०१) XPoSat चे प्रक्षेपण केले. PSLV-C58 रॉकेटच्या माध्यमातून 'एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह'चे श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झाले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना  'इस्रो'चे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी नूतन वर्षातील माेहिमेची माहिती दिली. (ISRO Chairman S Somnath)

डॉ. एस. सोमनाथ  म्‍हणाले की,  2024 हे वर्ष गगनयान तयारीसाठी असणार आहे. संपूर्ण वर्षच 'गगनयान वर्ष' असणार आहे. त्यासोबतच पॅराशूट सिस्टीम सिद्ध करण्यासाठी यंदाच्या वर्षात हेलिकॉप्टर-आधारित ड्रॉप टेस्ट देखील करण्यात येणार आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रॉप टेस्ट करण्यात येणार असल्याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.  (ISRO Chairman S Somnath)

अवकाश संशोधनासाठी महत्त्वाचे वर्ष

यंदाचे वर्ष हे अवकाश संशोधनासाठी महत्त्वाचे वर्ष अरणार आहेत. या वर्षात शेकडो मूल्यांकन चाचण्या आखण्यात आल्या आहेत. त्यासोबतच GSLV चे देखील प्रक्षेपण करण्यात येणार असल्‍याचे  डॉ. एस. सोमनाथ यांनी सांगितले. ISRO ने आज (दि.१) कृष्णविवरांसारख्या खगोलीय घटकांबद्दल सखोल अभ्यास करण्यासाठी सेट केलेल्या क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. (ISRO Chairman S Somnath)

२०२४ मध्ये किमान १२ ते १४ मोहिमांसाठी तयार 

नववर्ष २०२४ मधील १२ महिन्यात कमीतकमी १२ मोहिमांचे आमचे लक्ष्य आहे. हे आमच्या हार्डवर्क आणि क्षमतेवर अवलंबून आहे. जर सर्व चाचण्या आणि गोष्टी व्यवस्थित झाल्या, तर आणखी चांगले परिणाम दिसतील. नाहीतर आम्ही किमान १२ ते १४ नवीन अंतराळ मोहिमांसाठी तयार आहोत, असे देखील एस. सोमनाथ यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news