हमासचा क्रूर चेहरा इस्‍त्रायल जगासमोर आणणार, ‘नरसंहार’चे फुटेज करणार प्रसिद्ध

इस्‍त्रायल सरकारचे प्रवक्ते आयलॉन लेव्ही.
इस्‍त्रायल सरकारचे प्रवक्ते आयलॉन लेव्ही.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ७ ऑक्‍टोबर २०२३ रोजी इस्‍त्रायलवर दहशतवादी संघटना हमासने भीषण हल्‍ला केला होता. या दिवशी हमासच्या दहशतवाद्यांनी घडवलेल्या नरसंहाराचे न पाहिलेले फुटेज प्रसिद्ध करणार असल्‍याचे इस्रायलने जाहीर केले आहे. या हल्‍ल्‍यात १,४०० हून अधिक इस्रायली नागरिक ठार झाले होते. (  Israel to screen Hamas footage )

इस्‍त्रायल सरकारचे प्रवक्ते आयलॉन लेव्ही यांनी रविवारी (दि.२२) X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्‍हटले आहे की, हमास दहशतवाद्यांनी केलेल्‍या हल्‍ल्‍याचे फुटेज सोमवारी प्रदर्शित केले जाईल. हा व्हिडिओ, अद्याप लोकांनी पाहिला नाही. स्त्रिया आणि मुलांसह इस्रायली लोकांची क्रूर कत्तल आणि शेकडो ओलिस बनवल्याचे दाखवले आहे, असेही त्‍यांनी सांगितले.
आम्‍ही आता इस्‍त्रायलर्‍च्ंया नागरिकांवर केलेल्‍या महाभयंकर हल्‍ल्‍याचे आणि त्‍यांच्‍यावर केलेल्‍या अत्‍याचराचे फुटेज विदेशातील माध्‍यमांसमोर आज आम्‍ही प्रसिद्ध करणार आहोत, असेही लेव्‍ही यांनी स्‍पष्‍ट केले.

सोशल मीडिया आणि इतर ऑनलाइन मंचांवर असे दावे केले गेले आहेत की इस्रायल 7 ऑक्टोबर रोजी हमासने सुरू केलेल्या हिंसाचाराच्या लाटेची अतिशयोक्ती करत आहे. मात्र आता स्‍वत: इस्‍त्रायलच हमासच्‍या क्रौर्याचा व्‍हिडिओ माध्‍यमांसमोर आणणार आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news