‘हिजबुल्‍लाह’ने कल्‍पनाही केली नसेल असा विनाशकारक हल्‍ला करु : इस्‍त्रायलच्‍या पंतप्रधानांचा इशारा | पुढारी

'हिजबुल्‍लाह'ने कल्‍पनाही केली नसेल असा विनाशकारक हल्‍ला करु : इस्‍त्रायलच्‍या पंतप्रधानांचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इस्रायल-हमास रक्‍तरंजित संघर्षाचा आज १७ वा दिवस आहे. या संघर्षात आतापर्यंत सहा हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्‍लाह ही हमासला मदत करत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. हमाससोबतच्या युद्धात हस्तक्षेप केल्यास ही हिजबुल्लाची आतापर्यंतची सर्वात मोठी चूक असेल. तुम्‍ही कल्‍पनाही केली नसेल असा विनाशकारक हल्‍ला करु, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu )  यांनी दिला आहे.

इस्रायल कोणत्याही परिस्थितीसाठी सज्‍ज

रविवार दि. २२ ऑक्‍टोबर रोजी नेतन्‍याहू यांनी उत्तर इस्रायलमधील संरक्षण दलाच्या कमांडो ब्रिगेडला भेट दिली. यावेळी त्यांनी जवानांशी संवाद साधला. ते म्‍हणाले, “सध्या हिजबुल्ला युद्धात पूर्णपणे सहभागी आहे का, याबाबत स्‍पष्‍टता नाही. हमासविरोधात सुरु असलेल्‍या संघर्षात हिजबुल्लाने हस्‍तक्षेत केला तरी ती त्‍यांची सर्वात मोठी चूक करेल. हे हिजबुल्ला आणि लेबनॉनसाठी विनाशकारी असेल, असा इशारा देत  इस्रायल कोणत्याही परिस्थितीला सामाेरे जाण्‍यासाठी सज्‍ज असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा :

 

Back to top button