Israel-Palestine War : अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये युद्धाच्या भटक्यात अडकली; संपर्कही तुटला

Israel-Palestine War : अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये युद्धाच्या भटक्यात अडकली; संपर्कही तुटला
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : हमास संघटनेने इस्रायलवर शनिवारी सात हजार क्षेपणास्त्रे डागल्यानंतर मध्य पूर्वेत युद्ध (Israel-Palestine War) पेटले आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान बॉलिवूडमधूनही एक बातमी समोर येत आहे. अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrat Bharucha) इस्रायलमध्ये या युद्धाच्या भडक्यात अडकल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या टीममधील एका सदस्याने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करून याची पुष्टी केली आहे.

संबंधित बातम्या : 

मीडियासोबत शेअर केलेल्या निवेदनात तिच्या टीममधील एका सदस्याने सांगितले की, 'नुसरत भरुचा (Nushrat Bharucha) इस्रायलमध्ये अडकली आहे. हैफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी ती तिथे गेली होती. त्यांच्या टीमने दिलेल्या मेसेजनुसार शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास नुसरत सोबत  शेवटचा संपर्क झाला होता. त्यावेळी ती एका इमारतीच्या तळमजल्यावर सुरक्षित होती. तेव्हापासून तिच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. आम्ही संपर्क करू शकत नसल्याचे तिच्या टीमने सांगितले आहे. आम्ही नुसरतला सुखरूप भारतात परत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (Israel-Palestine War)

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news