History of Israel-Palestine conflict : इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाचा इतिहास; १९४७ साली स्वतंत्र घोषीत केले होते दोन भूभाग | पुढारी

History of Israel-Palestine conflict : इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाचा इतिहास; १९४७ साली स्वतंत्र घोषीत केले होते दोन भूभाग

पुढारी ऑनलाईन डेस्क : शनिवारी पुन्हा एकदा इस्राईल-पॅलेस्टाईन संघर्षाची ठिणगी पेटली आहे. पॅलेस्टाईनच्या हमास संघटनेने इस्राईलमध्ये ५००० रॉकेट हल्ले केले. या हल्ल्यानंतर इस्राईलने हे युद्ध असल्याची घोषणा करत लष्करी कारवाई सुरू केली. हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत ४० इस्राईली नागरिकांचा बळी गेला आहे, तर ५०० हून अधिक जखमी झाले आहेत. (History of Israel-Palestine conflict)

या घटनेची दखल जगभरात घेतली गेली आहे. भारत आणि युरोपने इस्राईलला पाठिंबा दिला आहे. शनिवारी हमासने अचानक हल्ले केले असले तरी या संघर्षाला गेल्या काही दशकांचा इतिहास आहे. (History of Israel-Palestine conflict)

संबंधित बातम्या

पॅलेस्टाईन-इस्राईल संघर्षाची सुरुवात | Israel-Palestine conflict

1947 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी पॅलेस्टाईनचे दोन भाग केले. त्यातील एक भाग ज्यूंना देण्यात आला होता तर दुसरा भाग अरब समूदायातील लोकांना देण्यात आला होता, जे बहुतेक इस्लामचे पालन करतात. 14 मे 1948 रोजी ज्यूंनी त्यांच्या भागाला एक स्वतंत्र देश घोषित केले, ज्याचे नाव इस्राईल होते. अरब समुदाय या निर्णयावर खूश नव्हता, म्हणून युद्ध घोषित करण्यात आले.

इजिप्त आणि इस्रायल दरम्यान पॅलेस्टिनी क्षेत्र | Palestinian territory between Egypt and Israel

युद्धानंतर संपूर्ण क्षेत्र (इस्राईल आणि पॅलेस्टाईन) तीन भागात विभागले गेले. पॅलेस्टाईनला वेस्ट बँक आणि गाझा पट्टीचे क्षेत्र मिळाले. गाझा पट्टी इस्रायल आणि इजिप्तच्या दरम्यान आहे. ही पट्टी एक लहान पॅलेस्टिनी क्षेत्र आहे. हे इजिप्त आणि इस्रायल दरम्यान भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. पॅलेस्टाईन हा अरब आणि बहुसंख्य मुस्लिम बहुल प्रदेश आहे. हे सर्व लोक निर्वासित आहेत आणि पहिल्या अरब-इस्रायल युद्धातील त्यांचे वंशज आहेत.

इस्रायलचा पश्चिम भागात विस्तार | Israel’s expansion to the west

सप्टेंबर 2005 मध्ये इस्रायलने गाझा पट्टीतून आपले सैन्य मागे घेतले. 2007 मध्ये इस्रायलने या भागावर अनेक निर्बंध लादले होते. वेस्ट बँक आणि गाझा पट्टीमध्ये स्वतंत्र पॅलेस्टिनी राज्य स्थापन करावे, असे पॅलेस्टाईनचे म्हणणे आहे. गाझा परिसर पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासच्या ताब्यात आहे. इस्राईलने युद्धात जेरुसलेम शहरही ताब्यात घेतले आणि शहराच्या पश्चिम भागात विस्तार केला.

गेल्या 25 वर्षांपासून ‘या’ मुद्द्यावर शांतता चर्चा

पॅलेस्टाईनला जेरुसलेम राजधानी बनवायची आहे, याशिवाय अरब समुदायाचे लोक जेरुसलेमला पवित्र स्थान मानतात कारण येथे अल-अक्सा मशीद आहे. ज्यूंमध्येही हे शहर पवित्र मानले जाते. गेल्या 25 वर्षांपासून या मुद्द्यावर शांतता चर्चा सुरू आहे, परंतु आजपर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. History of Israel-Palestine conflict

हेही वाचा

 

Back to top button