Israel-Palestine escalation | भारत इस्राईलच्या पाठीशी; पंतप्रधान मोदींची ग्वाही | India solidarity with Israel | पुढारी

Israel-Palestine escalation | भारत इस्राईलच्या पाठीशी; पंतप्रधान मोदींची ग्वाही | India solidarity with Israel

Israel-Palestine escalation : हमास आणि इस्राईलमध्ये धुमश्चक्री सुरू

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्राईलवर हमासच्या दहशतवाद्यांनी केलेला हल्ला धक्कादायक असून या कठीण काळात आम्ही इस्राईल सोबत आहोत, अशा शब्दांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राईलला पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. India solidarity with Israel

मोदी यांनी हा हल्ला धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. मोदींनी एक्सवर केलेल्या पोस्टनंतर #IndiaStandsWithIsrael हा ट्रेंडही सुरू झाला होता.

आज सकाळी हमास या दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीतून इस्राईलवर तब्बल ५ हजार रॉकेट डागले, यात इस्राईलचे २२ नागरिक ठार झाले आहेत, तर पाचशेच्यावर लोक जखमी झाले आहेत. तसेच हमासचे दहशतवादी इस्राईलमध्ये घुसले आहेत. हा हल्ल्यानंतर इस्राईलने गाझा पट्टीत चोख प्रत्युत्तर दिले आहे. India solidarity with Israel

22 इस्राईली नागरिकांचा मृत्यू

पॅलिस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने इस्राईलवर ५ हजार रॉकेट डागले, यात २२ इस्राईली नागरिकांचा मृत्यू झाला असून एकूण ५४५ नागरिक जखमी झालेले आहेत. हमासने केलेल्या इतक्या मोठ्या हल्ल्याची माहिती इस्राईलच्या गुप्तहेर संघटनेला कशी होऊ शकली नाही, याची चौकशी करण्याचे आदेश इस्राईलने दिले आहेत. दरम्यान इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यन्याहू यांनी हे युद्ध असल्याचे जाहीर केले आहे. (Israel-Palestine escalation)

इस्राईलने हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून लष्करी मोहीम सुरू केली असून त्याला Operation Iron Swords असे नाव दिले आहे.

हमासचे ‘Al Aqsa Flood’ | Israel at War against Hamas

हमासने या कारवाईला अल अक्सा फ्लड (Al Aqsa Flood) असे नाव दिले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू झाल्यानंतरची आताची जगातील सर्वांत मोठी भूसामरिक घटना म्हणून याकडे पाहिले जात आहे. इस्राईलने त्यांच्या भूमीवर मोठ्या प्रमाणावर दहशतावाद्यांनी घुसखोरी केल्याचे म्हटले आहे. गाझा पट्टीतून दहशतवादी इस्राईलमध्ये घुसले आहेत, त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये असे इस्राईलच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे.

हेही वाचा

Back to top button