Israel-Hamas war on ‘X’: इस्रायल-पॅलेस्टिनी युद्धप्रकरणी ‘UN’चे एलन मस्क यांना समन्स

Israel-Hamas war on 'X'
Israel-Hamas war on 'X'

पुढारी ऑनलाईन डेस्क: पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेच्या हल्ल्याला इस्रायलने जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली आहे. एलन मस्क यांच्या मालकीच्या X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील या युद्धासंर्भातील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पण हे बनावट असल्याचे म्हणत युरोपिय युनिनने या प्रकरणी 'टेस्ला' आणि 'एक्स'चे सीईओ एलन मस्क यांना समन्स बजावले आहे, असे वृत्त 'इंडिया टुडे' ने दिले आहे. Israel-Hamas war on 'X')

इस्रायल-पॅलेस्टिनी यांच्यातील संघर्ष पेटला आहे. दरम्यान इस्रायलने कोणताही युद्धविराम नाही, असे म्हणत हवाई हल्ल्यानंतर आता जमिनीवर युद्धारंभाचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर इस्रायली सैन्याने पॅलेस्टिनींना गाझा पट्टी खाली करण्याचे आदेश दिले आहेत. या इस्रायल- हमास संर्घषाची जगभर चर्चा सुरू आहे. दरम्यान अनेक देशांच्या प्रमुखांनी इस्रायल-पॅलेस्टिनींना आपआपला पाठिंबा दिला आहे. या संघर्षा संदर्भातील मोठा डेटा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत आहे. दरम्यान UN कडून X प्लॅटफॉर्मवर फेक पोस्ट संदर्भात कारवाई करत, समन्स बजावण्यात आले आहे. (Israel-Hamas war on 'X')

 

View this post on Instagram

 

A post shared by India Today (@indiatoday)

ऑस्ट्रेलिया ई-सुरक्षा आयोगाने मस्क यांच्या 'X' प्लॅटफॉर्मला ठोठावला दंड

सोशल मीडिया कंपनी X ला (पूर्वीचे ट्विटर) ऑस्ट्रेलियाच्या इसेफ्टी कमिशनने मोठा दणका दिला आहे. ऑस्ट्रेलियाने एलन मस्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर 38 लाख 6 हजार डॉलरचा दंड ठोठावला आहे. बाल शोषणाच्या तपासात सहकार्य न केल्याने एक्सवर ही कारवाई करण्यात आली आहे, असे 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Israel-Hamas war on 'X')

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news