Israel-Hamas War | आता ‘युद्धविराम’ नाही! इस्रायल पीएम बेंजामिन नेतन्याहू यांचे ट्विट चर्चेत

Israel-Hamas War | आता ‘युद्धविराम’ नाही! इस्रायल पीएम बेंजामिन नेतन्याहू यांचे ट्विट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष शिगेला पोहोचला आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने केलेल्या हल्ल्यांना इस्रायलने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी 'कोणताही युद्धविराम नाही' असे विधान केले आहे. पंतप्रधान इस्रायल या X अकाऊंटवरून या संदर्भातील पोस्ट करण्यात आली आहे. (Israel-Hamas War)

हमासने अचानक केलेल्या हल्ल्यात इस्रायलमध्ये सुमारे 1400 लोक मारले गेले. प्रत्युत्तर म्हणून, इस्रायलने गाझा पट्टीवर एकापाठोपाठ एक अनेक हवाई हल्ले केले, ज्यात किमान 2600 लोक मारले गेले आणि 5000 हून अधिक लोक जखमी झाले.

उत्तर गाझा पट्टीतील नागरिक दक्षिणेकडे सरकले आहेत. यातील हजारो गझन रफाह सीमा ओलांडून इजिप्तमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. युद्धबंदीच्या वृत्तांदरम्यान हजारो गाझा रहिवासी इजिप्तमध्ये प्रवेश करण्याच्या आशेने रफाह सीमेवर पोहोचले आहेत. परंतु इस्रायलने गाझा युद्धबंदीच्या वृत्ताचे खंडन केले आहे. इस्रायलने गाझा रहिवाशांना इजिप्तमध्ये पळून जाण्यासाठी युद्धविराम करण्यास सहमती दर्शविल्याच्या वृत्ताचे ठामपणे खंडन केले आहे.

इस्रायल, अमेरिका आणि इजिप्तमध्ये युद्धविराम नाही

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने अशा कोणत्याही युद्धविराम योजनेला तेल अवीवने सहमती दर्शवली नसल्याचे म्हटले आहे. इस्रायलने युद्धविरामाची घोषणा केल्याच्या बातम्या एएफपी या वृत्तसंस्थेने दुपारी दिल्या. इस्रायल, अमेरिका आणि इजिप्त यांनी युद्धविराम योजनेवर सहमती दर्शविल्याच्या वृत्तानंतर हे विधान आले आहे. याअंतर्गत इस्रायल आपले हल्ले थांबवेल आणि इजिप्त गाझा नागरिकांसाठी सुटकेसाठी सीमा खुली करेल,असे म्हटले होते. परंतु इस्रायल 'पीएमओ'ने कोणताही 'युद्धविराम' नाही! म्हटले आहे.

गाझाचे भौगोलिक स्थान असे आहे

पॅलेस्टाईनमधीस गाझा शहराच्या भौगोलिक स्थितीबद्दल बोलायचे तर ती एक अरुंद पट्टी आहे. गाझाच्या पश्चिमेला भूमध्य समुद्र, पूर्वेला इस्रायल आणि उत्तरेला इजिप्त आणि नैऋत्येला इजिप्त आहे. इस्रायल या संपूर्ण भागावर बारीक नजर ठेवून आहे. गाझामधून बाहेर पडण्याचे दोन मार्ग आहेत – इरेझ क्रॉसिंग इस्त्राईल आणि इजिप्तची रफाह सीमा. गाझामध्ये विमानतळ नाही. इस्रायलचे हवाई क्षेत्र आणि पाण्यावरही नियंत्रण आहे, असे एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

इस्रायल-हमास संघर्ष: रशियाची UNSC च्या ठरावावर मतदान घेण्याची मागणी

दरम्यान रशियाने देखील युद्धविरामाला दुजोरा देत, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला (UNSC) सोमवारी इस्रायल-हमास संघर्षावरील प्रस्तावित ठरावावर मतदान घेण्याचे आवाहन केले होते. या ठरावात इस्रायल अन् पॅलेस्टिनी नागरिकांवरील हिंसाचार आणि दहशतवादाचा निषेध करण्यात आला आहे. तसेच तात्काळ युद्धविरामाची मागणी करण्यात आली आहे. मात्र अशा चर्चांवर 'कोणताही युद्धविराम नाही' असे ट्विट शेअर करत, पीएम बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षावरील इस्रायलची भूमिका स्पष्ट केली आहे. (Israel-Hamas War )

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news