Israel-Hamas war : युद्धाच्या ३९ व्या दिवशी इस्रायलचा हमासच्या ‘संसदे’वर कब्जा, IDF ने झेंडा फडकवला

Israel-Hamas war : युद्धाच्या ३९ व्या दिवशी इस्रायलचा हमासच्या ‘संसदे’वर कब्जा, IDF ने झेंडा फडकवला
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गाझातील बहुतांश भाग इस्रायली लष्कराने आपल्या ताब्यात घेतला आहे. आता इस्रायली सैनिक गाझा येथील हमासच्या संसदेत पोहोचले आहेत. इस्रायली लष्कराने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये इस्रायली सैनिक हमासच्या संसदेत आपला झेंडा फडकवताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या : 

फोटोमध्ये इस्रायली सैनिक हमासच्या संसदेत अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. तसेच इस्रायलचा ध्वज फडकवला आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले, इस्रायली सैनिक योजनेनुसार काम करत आहेत आणि गुप्तचर माहितीचा वापर करून ते हमासला संपवत आहेत. यावेळी हवाई, सागरी आणि भूदल सैन्य समन्वयाने मोहिमा राबवत आहेत.

हमासने गाझावरील नियंत्रण गमावले : इस्रायल

संरक्षण मंत्री योव गॅलंट पुढे म्हणाले की, 'हमासमध्ये आयडीएफला रोखू शकण्याची ताकद नाही. हमासने गाझावरील नियंत्रण गमावले आहे, दहशतवादी दक्षिणेकडे पळून जात आहेत, नागरिक हमासच्या तळांना लुटत आहेत आणि त्यांचा सरकारवर विश्वास नाही.' इस्रायली सैन्याने म्हटले आहे की, IDF ने हमासच्या २४ बटालियनपैकी १० तळ नष्ट केले आहेत. हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. हमासने आपल्या ३० हजार सैनिकांसह हे युद्ध सुरू केले. हमासचे सैनिक ५ ब्रिगेड आणि २४ बटालियनमध्ये विभागले गेले. प्रत्येक बटालियनमध्ये १ हजार पेक्षा जास्त सैनिक होते.

गाझातील ११,२४० लोकांचा बळी

गाझामधील या संघर्षात आतापर्यंत ११,२४० लोकांचा बळी गेला आहे. ज्यात ४,६३० मुलांचा समावेश आहे. इस्रायलच्या लष्करी मोहिमेमुळे गाझातील दोन तृतीयांश लोकसंख्या बेघर झाली आहे. इस्रायलने गाझाच्या उत्तरेकडील अर्धा भाग पूर्णपणे रिकामा करण्याचे आदेश दिले होते. तसेच नागरिकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले होते.

हॉस्पिटलमध्ये हमासचा तळ, आयडीएफने दिले पुरावे

आयडीएफचे प्रवक्ते रीड अॅडमिरल डॅनियल हगारी म्हणाले की, हमास इस्रायली ओलिसांना हॉस्पिटलच्या तळघरात ठेवत असल्याचे पुरावे आहेत. इस्रायली नौदल आणि इतर सैन्याच्या १३ कमांडो तुकड्यांनी गाझा येथील रेंटीसी हॉस्पिटलवर छापा टाकला. हॉस्पिटलच्या खाली असलेल्या तळघरात हमासचे कमांड अँड कंट्रोल सेंटर, आत्मघाती बॉम्ब वेस्ट, ग्रेनेड, एके-४७, असॉल्ट रायफल, स्फोटक उपकरणे, आरपीजी आणि इतर शस्त्रे, संगणक आणि पैसे जप्त केले. येथे ओलीस ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या या तळघराची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे युद्ध हमासविरुद्ध आणि दहशतवाद्यांविरुद्ध आहे. दहशतवादी नागरिकांचा ढाल म्हणून वापर करतात, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news