Mahadev Betting App Malpractice : महादेव बेटिंग ॲप गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्रात तक्रार दाखल

Mahadev Betting App Malpractice : महादेव बेटिंग ॲप गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्रात तक्रार दाखल
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Mahadev Betting App Malpractice : महादेव बेटिंग ॲप गैरव्यवहार प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातही जोडले गेले असून या प्रकरणी राज्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचा खळबळजनक दावा आज (दि. 13) भाजपने केला आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी गैरव्यवहारतून जमा केलेले कोट्यवधी रूपये गांधी कुटुंबाला दिल्याचा मोठा आरोप भाजपने केला.

छत्तीसगडमध्ये निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असताना महादेव बेटिंग ॲपमध्ये प्रकरणावरून आज भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर निशाणा साधला. महादेव बेटिंग ॲप गैरव्यवहारातून जमा झालेला पैसा गांधी कुटुंबाच्या तिजोरीत जात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना परदेशातील मुद्यांवर बोलायला वेळ मिळतो मात्र छत्तीसगडमधील परिस्थितीवर ते कानाडोळा करत असल्याचा टोला लगावला. (Mahadev Betting App Malpractice)

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची घर घर महादेव बेटिंग ॲप ही एकच घोषणा असून त्यांचे आता दिवस भरले असल्याचा घणघात गौरव भाटिया यांनी केला. छत्तीसगडमध्ये अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्यूला ठरला असतांना काँग्रेसने बघेल यांना पूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्रीपद दिले कारण जो जितका जास्त भ्रष्टाचार करू शकेल त्याला गांधी कुटूंबाकडून मोठ मोठी पदे दिली जात असल्याचे भाटियांनी म्हटले. तपास यंत्रणाच्या दाव्याचा उल्लेख करत महादेव बेटिंग ॲप गैरव्यवहार प्रकरणात भूपेश बघेल यांना 508 कोटी रूपये मिळाले असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला. (Mahadev Betting App Malpractice)

सामान्य जनतेच्या मेहनतीचा पैसा बघेल छत्तीसगड आणि गांधी कुटूंब इतर राज्यातील निवडणुका जिंकण्यासाठी वापरत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तपास यंत्रणा आपले काम करत असून गैरव्यवहार करणाऱ्यांना कायद्यानुसार शिक्षा होईलच यात काही शंका नाही. मात्र त्याआधी भूपेश बघेल आणि काँग्रेसच्या काळ्या कृत्यांना जनताच लवकर उत्तर देणार असा दावा गौरव भाटिया यांनी व्यक्त केला. (Mahadev Betting App Malpractice)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news