Israel-Hamas War : इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा आणखी एक म्होरक्या ठार

Israel-Hamas war
Israel-Hamas war

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायलच्या हवाई ( israeli air force) हल्ल्यात हमास या दहशतवादी संघटनेचा आणखी एक म्होरक्या आज (दि. १५) मारला गेला आहे. बिलाल-अल-केद्रा असे त्याचे नाव आहे. बिलाल-अल-केद्रा हा हमासच्या नुखबा फोर्सचा कमांडर होता. नुखबा फोर्स हे हमासच्या नौदलाचे विशेष दल आहे. (Israel-Hamas War)

संबंधित बातम्या :

इस्रायली हवाई दलाने (israeli air force) एक निवेदन जारी करून म्हटले आहे की,  बिलाल अल-केद्रा हा दक्षिण गाझा पट्टीतील खान युनिस परिसरात असल्याची गुप्तचर माहिती मिळाली होती. गुप्तचर माहितीच्या आधारे हवाई हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये बिलाल अल-केद्रा ठार झाला. या हल्ल्यात हमासचे इतर अनेक दहशतवादी मारले गेल्याचा दावा इस्रायली हवाई दलाने केला आहे. इस्रायलच्या हवाई दलाने या हल्ल्याचा व्हिडिओही जारी केला आहे. (Israel-Hamas War)

हमासच्या लष्करी तळांवर बॉम्ब हल्ला

इस्रायली वायुसेनेने (israeli air force) गाझा पट्टीतील खान युनिस, जेतुन आणि जबालिया पश्चिम भागातील १०० हून अधिक लष्करी ठिकाणांवर हल्ले केले. यादरम्यान हमासच्या कमांडर सेंटर्स आणि सैन्य ठिकाणांना लक्ष्य केले होते. या हल्ल्यात हमासची अनेक क्षेपणास्त्रे आणि लॉन्च पॅड उद्ध्वस्त झाले आहेत. इस्राइलने म्हटले आहे की, यापूर्वी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये रक्तपात घडवला होता, तेव्हा किबुत्झ निरीममधील हिंसाचारामागे बिलाल अल-केद्राचा हात होता. यापूर्वी हमासचे हवाई दल प्रमुख मुराद अबू मुराद हेही इस्रायलच्या हवाई दलाच्या हल्ल्यात मारले गेले होते.

इस्रायलकडून तीन तासांचा अवधी

इस्रायली लष्कराने उत्तर गाझा रिकामा करण्याचा आदेश दिला आहे. आता इस्रायलने उत्तर गाझामधील लष्करी कारवाई थांबवली असून लोकांना हा परिसर रिकामा करण्यासाठी तीन तासांचा अवधी दिला आहे. इस्रायली लष्कराने उत्तर गाझामध्ये राहणाऱ्या लोकांना दक्षिण गाझामध्ये जाण्यास सांगितले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news