पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमास यांच्यात महिनाभरापासून युद्ध सुरू आहे. हा संघर्ष दिवसोंदिवस अधिक चिघळत चालल्याचे दिसत आहे. अमेरिकेने वारंवार इस्रायलच्या भक्कम पाठिंबा व्यक्त केला आहे. मात्र, आता गाझा शहर ताब्यात घेण्याच्या मुद्यावरून अमेरिकेने इस्त्रायलला फटकारले आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धावरुन असणारे मतभेद प्रथमच चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे.
व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले की, इस्त्रायल सैन्य दलाने गाझा शहर पुन्हा ताब्यात घेणे ही चांगली कल्पना नाही, असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मत आहे. इस्रायलची ही कृती गाझा शहरातील नागरिकांसाठीचांगली ठरणडार नाही. परराष्ट्र मंत्री ब्लिंकन यांच्या संभाषणाचा संदर्भ देत किर्बी यांनी स्पष्ट केले की, युद्ध सुरु झाल्यानंतर गाझाची पूर्ण वाताहत झाली आहे. काहीही असले तरी युद्ध सुरु होण्यापूर्वी सारखा म्हणजे 6 ऑक्टोबरला होता तसे गाझा शहर आज राहिलेले नाही. .
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सोमवारी एका मुलाखतीत म्हणाले की, गाझा शहरात आश्रय घेतलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना शिक्षा होणे गरजेचे आहे. मला वाटते की गाझा शहरातची सुरक्षा जबाबदारी इस्रायलकडे अनिश्चित काळासाठी असेल कारण ती नसताना काय होते ते आम्ही पाहिले आहे.' दरम्यान, नेतन्याहू याच्या विधानावर अमेरिकने असहमती दर्शवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले होते की, गाझा शहर ताब्यात घेणे ही इस्रायलसाठी मोठी चूक असेल, आता युद्ध सुरू असताना अमेरिका आणि इस्रायलमध्ये इतर मतभेद चव्हाट्यावर येत आहेत.
पॅलेस्टिनच्या आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, गाझामध्ये आतापर्यंत 10 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 25,408 लोक जखमी झाले आहेत. रफाह सीमा पुन्हा एकदा पॅलेस्टिनींसाठी खुली करण्यात आली आहे. अहवालानुसार, मृतांमध्ये किती सैनिक होते आणि किती सामान्य लोक होते हे आताचा सांगता येणार नाही, असेही आरोग्य मंत्रालयाने नमूद केले होते.
हेही वाचा :