Israel-Hamas war: इस्रायलने गाझा पट्टीतील २५०० हून अधिक ठिकाणांना केले लक्ष्य | पुढारी

Israel-Hamas war: इस्रायलने गाझा पट्टीतील २५०० हून अधिक ठिकाणांना केले लक्ष्य

पुढारी ऑनलाईन डेस्क: इस्रायल सैन्याने हवाई हल्ल्यानंतर आता गाझा पट्टीत जमिनीवरील कारवाया वाढल्या आहेत. या हल्ल्यांत इस्रायलने ‘ऑपरेशन स्वॉर्ड्स ऑफ आयर्न’ राबविले. या ऑपरेशनच्या माध्यमातून इस्रायलने आत्तापर्यंत २५०० हून अधिक ठिकाणांना लक्ष्य करत हल्ले केले आहेत, अशी माहिती इस्रायल डिफेन्स फोर्सने (IDF) दिली आहे, यासंदर्भातील वृत्त ‘जेरुसलेम पोस्ट’ने दिले आहे. (Israel-Hamas war)

इस्रायल डिफेन्स फोर्स सैन्याने क्लोज क्वार्टर लढाईत हमास दहशतवाद्यांचा खात्मा करणे सुरूच ठेवले आहे. इस्रायलकडून गाझा शहरातील पायाभूत सुविधा, शस्त्रे डेपो आणि गाझामधील हमास कमांडर आणि नियंत्रण केंद्रांवर हवाई हल्ले करणे सुरू ठेवले आहे. उत्तर गाझामध्ये हमासचे नेतृत्व आणि पायाभूत सुविधांविरुद्ध आमचे सैन्य कार्यरत असल्‍याचे  इस्रायल डिफेन्स फोर्सने म्हटले आहे.

हेही वाचा:

 

Back to top button