इस्रायल सैन्याकडून गाझा बॉर्डर सील; हवाई हल्ल्यानंतर आता जमीनीवर युद्ध (व्हिडिओ)

Israel Gaza border
Israel Gaza border

पुढारी ऑनलाईन डेस्क: पॅलेस्टाईनमधील हमास दहशतवादी संघटनेने ५ हजार रॉकेट इस्रायलवर डागत युद्धाला सुरूवात केली. इस्रायलने देखील हमासने केलेल्या हवाई हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान इस्रायलकडून गाझा पट्टीतील नागरिकांना घरे सोडण्याचा इशारा दिला आहे. इस्रायलकडून गाझा बॉर्डरवर सैन्य तैनात करणयात आले असून, हवाई हल्ल्यानंतर आता जमीनीवर युद्धारंभाचे संकेत इस्रायलकडून दिले जात आहेत. या संदर्भातील व्हिडिओ AFP ने शेअर केला आहे. (Israel Gaza border)

Israel Gaza border: गाझामधून ४२ लाखांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर

हमास दहशतवादी संघटनेने इस्रायमधील गाझा शहरावर रॉकेट हल्ले केले. यामध्ये २ हजारांहून अधिक लोक मारले गेले, हजारांहून अधिक लोक जखमी झालेत तर १५० हून अधिक नागरिकांना हमासने ओलिस ठेवले आहेत. दरम्यान आतापर्यंत गाझामधून ४२ लाख ३ हजार नागरिकांनी गाझामधून स्थलांतर केल्याचे म्हटले आहे. तर उर्वरिक ११ लाख नागरिकांना लवकरात लवकर गाझा सोडण्याचे आदेश इस्रायलने दिले आहेत. या संदर्भातील निवेदन इस्त्रायली संरक्षण दलाने (IDF) केले आहे. (Israel Gaza border)

 संयुक्त राष्ट्राकडून 'विनाशकारी' परिणामांचा इशारा

हमासने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना इस्रायलने युद्धाची तयारी केली आहे. हवाई हल्ल्यातून प्रत्युत्तर दिल्यानंतर, आता इस्रायल अमेरिकेच्या सहकार्याने हमासविरोधी गाझा जमीनीवर युद्धारंभ करण्यास सज्ज आहे. इस्त्रायली संरक्षण दलाने गाझा शहरातील सर्व नागरिकांना त्यांच्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी आणि संरक्षणासाठी त्यांच्या घरातून बाहेर पडण्यास सांगितले आहे. तसेच नकाशावर दर्शविल्याप्रमाणे गाझाच्या दक्षिणेकडील भागात जाण्याचे आवाहन केले आहे, लष्कराच्या निवेदनात हे म्हटले आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्रांनी 'विनाशकारी' परिणामांचा इशारा देखील दिला आहे. (Israel Gaza border)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news