Israel Hamas War : इस्रायलचा गाझातील निवासी इमारतीवर हल्ला; ३० पॅलेस्टिनी ठार, २४ तासांत २६६ जणांचा मृत्यू

Israel Hamas War : इस्रायलचा गाझातील निवासी इमारतीवर हल्ला; ३० पॅलेस्टिनी ठार, २४ तासांत २६६ जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष सुरू होऊन दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे. दोन्ही बाजूंनी आतापर्यंत झालेल्या हल्ल्यातील मृतांची संख्या आता ६ हजारच्या पुढे गेली आहे. रविवारी इस्रायलने गाझामधील एका निवासी इमारतीवर हल्ला केला. यामध्ये ३० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत इस्रायली हवाई हल्ल्यात ११७ मुलांसह २६६ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत.

इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात १४०० जणांना जीव गमवावा लागला आहे, तर गाझा पट्टीवर इस्रायलने केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत मृतांचा आकडा ४६०० च्या वर गेला आहे. दोन्ही बाजूंच्या या संघर्षादरम्यान, इराण समर्थित संघटना हिजबुल्लाहचे देखील इस्रायलवर हल्ले सुरू आहेत. गाझाच्या जबलिया येथील अल-शुहादा भागातील इमारतीवर इस्रायलने हल्ला केला. पॅलेस्टिनी मीडियानुसार, हल्ल्यानंतर इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि इमारतीतील जवळपास ३० लोकांचा मृत्यू झाला.

गेल्या २४ तासात २६६ जणांचा मृत्यू

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दावा केला आहे की, गेल्या २४ तासांत इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ११७ मुलांसह २६६ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन आठवड्यात गाझा पट्टी हल्ल्यात ४६०० लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यामुळे १४०० लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलवर रॉकेट हल्ला करण्याची तयारी सुरू असताना त्यांनी लेबनॉनमधील हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेच्या दोन तळांना लक्ष्य केल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले.

बेंजामिन नेतन्याहू यांचा हिजबुल्लाला इशारा

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हिजबुल्लाला इशारा दिला आहे. जर हिजबुल्ला युद्धात सामील झाला तर दुसरे लेबनॉन युद्ध होऊ शकते आणि ही हिजबुल्लाची सर्वात मोठी चूक असेल. इस्त्रायली क्षेपणास्त्रांनी दमास्कस आणि अलेप्पो आंतरराष्ट्रीय विमानतळावरही हल्ला केल्याचा दावा सीरियन मीडियाने केला आहे. त्यामुळे विमानसेवा विस्कळीत झाली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news