Israel and hamas war: इस्रायल-हमास संघर्षात विदेशी नागरिकांवर ‘कुऱ्हाड’, अमेरिकेसह विविध देशांमधील नागरिक ठार

Israel and Palestine War Update
Israel and Palestine War Update

पुढारी ऑनलाईन डेस्क : हमास दहशतवादी संघटनेने इस्रायलवर शनिवरी (दि.९) रॉकेट हल्ला केला. इस्रायल लष्करानेही या हल्‍ल्‍याला जोरदार प्रत्त्युत्तर दिले. 'हमास-इस्रायल' संघर्षात इस्रायली नागरिकांसोबत विदेशी नागरिकांचाही मृत्यू झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.  अनेक पर्यटकांना  या संघर्षात आपला जीव गमवावा लागला आहे. (Israel and hamas war)

Israel and hamas war:  थायलंडमधील १२ नागरिकांचा मृत्यू

हमास- इस्रायल संघर्षात आत्तापर्यंत सुमारे १,१०० लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. इस्राईल संरक्षण मंत्रालयाने  दिलेल्या माहितीनुसार, हमास दहशतवादी गटांनी गाझामधील सुमारे ५०० हून अधिक टार्गेट्सवर हल्ला केला आहे. दरम्यान, या हल्ल्यात अमेरिकेतील ४ नागरिकांसह, १० नेपाळी नागरिक मारले गेलेत. तर थायलंड परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे १२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, असे वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया' ने दिले आहे. (Israel and hamas war)

हल्लायत ४ अमेरिकन नागरिकाचा मृत्यू

प्राथमिक अहवालानुसार इस्रायलविरुद्धच्या हल्ल्यात किमान ४ अमेरिकन नागरिक मारले गेले, असे एका अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले.

नेपाळचे 10 नागरिक मारले गेले

पॅलेस्टिनी अतिरेकी गट हमासने इस्रायलच्या दक्षिणेकडील भागात रॉकेट हल्ले सुरू केलेत. दरम्यान इस्रायलमध्ये दहा नेपाळी नागरिक ठार झाले असून चार जण जखमी झाले आहेत, असे नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी सांगितले.

थायलंडच्या ११ जणांचे अपहरण

थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, इस्रायलमधील हल्लायत १२ थाई नागरिक ठार झालेत तर ८ जण जखमी झाले आहेत. तसेच आणखी ११ नागरिकांचे अपहरण झाले आहे. दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या कांचना पत्राचोके यांनी 'आम्ही इस्रायलमधील सर्व थायलंडच्‍या नागरिकांना मदत करण्यासाठी काम करत असल्याचे म्‍हटले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news