भयंकर हल्‍ला..! इस्त्रायल संगीत महोत्‍सवात रक्‍ताचा सडा, २६० हून अधिक मृत झाल्‍याची भीती

Israeli Music festival
Israeli Music festival
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दहशतवादी संघटना हमासने शनिवारी सकाळी इस्त्रायलवर हल्‍ला केला. यावेळी गाझा-इस्त्रायल सीमेजवळील आयोजित संगीत महोत्‍सवही ( Israeli Music festival) टार्गेट करण्‍यात आला. येथे दहशतवादा्‍यांनी अंदाधूंद गोळीबार केला. इस्त्रायली बचाव सेवा झकाच्या म्हणण्यानुसार, उत्सवाच्या ठिकाणी किमान 260 मृतदेह सापडतील. काही उपस्थितांना ओलीस ठेवण्यात आले सोशल मीडियावरील एका व्‍हायरल व्‍हिडिओमध्‍ये दिसत असल्‍याचे वृत्त 'सीएनएन'ने दिले आहे. (israel and hamas war )

israel and hamas war: आजवरचा सर्वात भयंकर हल्‍ला

हमासने शनिवारी पहाटे इस्त्रायलवर रॉकेट हल्‍ला केला. शनिवारी ज्यू सुट्टीचा उत्सव साजरा करणारी गाझा-इस्त्रायल सीमेजवळसंगीत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. एकीकडे दहशतवाद्‍यांनी रॉकेट हल्‍ला केला तर दुसरीरकडे संगीत महोत्सवात भाग घेतलेलल्‍यांवर दहशतवाद्‍यांनी अंदाधूंद गोळीबार केला. हमासच्या दहशतवाद्‍यांनी इस्त्राईलमध्ये आतापर्यंत केलेल्या हा सर्वात भयंकर हल्‍ला मानला जात आहे. (Israeli Music festival)

इस्त्रायली बचाव सेवा 'झका'ने दिलेल्‍या माहितीनुसार, संगीत महोत्‍सवाच्‍या ठिकाणी काही उपस्थितांना ओलीस ठेवण्यात आले होते. याचा एक व्‍हिडिओही सध्‍या सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे. अचानक झालेल्‍या हल्‍ल्‍याने महोत्‍सावात एकच खळबळ माजली. सारेजण सैरावैरा पळू लागले.काहींनी कारमधून पळून जाण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र रॉकेट हल्‍ल्‍यामुळे रस्ते खचल्‍यामुळे वाहनांची कोंडी झाली. (Israeli Music festival)

सोशल मीडियावर व्‍हायरल झालेल्‍या व्हिडिओमध्ये शेकडो उपस्थित लोक त्यांच्या कारमधून पळून जाताना आणि अंदाधूंद गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहे. उत्सवाच्या ठिकाणी किमान 260 मृतदेह सापडतील. असेही 'सीएनएन'ने आपल्‍या वृत्तात म्‍हटलं आहे. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, एक इस्रायली महिला आणि तिचा प्रियकर. ज्यांची ओळख नोआ अर्गामनी आणि अविनातान ओर अशी झाली आहे. त्‍यांनी या संगीत महोत्‍सवाला हजेरी लावली होती. त्यांचे अपहरण झाल्याचे दाखवण्यात आले आहे.

इस्रायलच्‍या पंतप्रधानांनी दिला 'दीर्घ युद्धा'चा इशारा

इस्रायली सैन्य आणि हमास दहशतवादी यांच्यात झालेल्या संघर्षात आतापर्यंत ७०० हून अधिक इस्रायली आणि ४०० पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी 'दीर्घ युद्ध' होण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news