पुढारी ऑनलाईन डेस्क : आएसपीएलच्या गुरुवारी (दि.7) दादोजी कोंडदेव स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात कोलकाता टायगर्सला चेन्नई सिंगम्सने आठ धावांनी पराभूत करून विजयी सलामी दिली. चेन्नईकडून आर. थविथ कुमार (4-13) आणि बबलू पाटील (23*) हे विजयाचे शिल्पकार ठरले. (ISPL)
सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 5 विकेट गमावून 121 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाता संघाला 113 धावांवर रोखून चेन्नईने सामन्यात 8 धावांनी विजय मिळवला.
कोलकाताकडून फरदीन काझीवने 9 बॉलमध्ये 2 चौकारा आणि 2 षटकाराच्या सहाय्याने 21 धावा केल्या. त्याच्यासह जॉन्टी सरकार यांने 17 बॉलमध्ये 1 चौकार आणि 3 षटकारांच्या सहाय्याने 23 धावा केल्या. तथापि चेन्नईचा गोलंदाज आर. थविथ कुमारने अचूक मारा करत 2 ओव्हरमध्ये 13 धावा देत 4 विकेट घेतल्या. त्याच्या कामगिरीने चेन्नई संघाने सामन्यात कमबॅक केले.
तत्पूर्वी, सागर अलीच्या 34 (17 चेंडू, 3 षटकार) आणि बबलू पाटीलच्या 23* (8 चेंडू, 1 चौकार, 3 षटकार) फटकेबाजीमुळे चेन्नईला चांगली धावसंख्या रचता आली. चेन्नईचा कर्णधार सुमीत ढेकळे (11, 9 चेंडू, 1 षटकार) आणि केतन म्हात्रे यांनी (16, 7 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार) दमदार सुरुवात केली. अन्य फलंदाजांनी धावगती राखण्यात यश मिळवले. कोलकात्याच्या टायगर्सकडून भावेश पवारने (2-16) प्रभावी मारा केला.
हेही वाचा :