IPS vs IAS : ‘त्या’ आक्षेपार्ह फोटोवरुन कर्नाटकच्या दोन महिला अधिकाऱ्यांत ‘तू-तू-मै-मै’

IPS vs IAS : ‘त्या’ आक्षेपार्ह फोटोवरुन कर्नाटकच्या दोन महिला अधिकाऱ्यांत ‘तू-तू-मै-मै’

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकमध्ये दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या जोरदार आरोपांमुळे नोकरशाही वर्तुळात खळबळ उडाली आहे. आयएएस रोहिणी सिंधुरी (IAS-Indian Administrative Service)  आणि आयपीएस डी रूपा मौदगील ( IPS-Indian Police Service) यांच्यातील  वाद विकोपाला गेला आहे. IPS अधिकारी रूपा यांनी IAS रोहिणी यांच्यावर १९ आरोप केले आहेत. तर IAS रोहिणी यांनी असा आरोप केला आहे की, रूपा या मला बदनाम करण्यासाठी मोहीम चालवत आहेत. एवढेच नाही तर या महिला अधिकाऱ्यांनी एकमेकींवरील  आरोप सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वाचा सविस्तर बातमी. ( IPS vs IAS )

काय आहे रोहिणी यांचा आरोप

आयएएस रोहिणी सिंधुरी म्हणाल्या की, आयपीएस डी रूपा माझ्याविरोधात खोटी मोहीम चालवत आहेत. त्यांना  माझी बदनामी करायची आहे. आतापर्यंत त्या हेच काम करत आल्या आहेत. माध्यमांच्या माध्यमातून हेच करत आल्या आहेत.  त्यांच सोशल मीडिया प्रोफाइल या कामाचा पुरावा आहे. त्या नेहमी लोकांना लक्ष्य करतात. हा त्यांचा आवडता टाईमपास आहे. रोहिणी यांनी पुढे असेही म्हंटलं आहे की,"  मी डी. रूपा यांच्याविरुद्ध  IPS च्या विविध कलमांतर्गत गैरवर्तन आणि फौजदारी गुन्ह्यांसाठी योग्य अधिकारांसह कायदेशीर कारवाई करेन. माझ्या फोटोंचा वापर माझी बदनामी करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने केला गेला आहे. वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना आक्षेपार्ह छायाचित्रे पाठवली आहेत. त्याचबरोबर फेसबुक पेजवरही फोटो शेअर केले आहेत आणि ती तिच्या सोशल मीडियावरही शेअर केली आहेत . पुरुष आयएएस अधिकाऱ्यांना आपले फोटो पाठवून सेवा आचार नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

 अधिकाऱ्यांना फोटो पाठवणे नियमांचे उल्लंघन

आयपीएस रूपा सांगतात की रोहिणीने अनेक वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना फोटो पाठवले आहेत. याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. असे चित्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवणे म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन आहे.

 IPS vs IAS : रूपा यांचे १९ आरोप 

डी रूपा मौदगील ( IPS) यांनी रोहिणी यांच्यावर आतापर्यंत १९ आरोप केले आहेत. यामध्ये त्यांनी म्हंटलं आहे की," जेव्हा रोहिणी मंड्याच्या जिल्हा पंचायत सीईओ बनल्या तेव्हा त्यांनी शौचालयांच्या संख्येत फेरफार केला आहे. आकडे फुगवून त्यांनी केंद्र सरकारकडून पुरस्कार मिळविला. मात्र याची चौकशी अद्यापही झालेली नाही. चामराजनगरमध्ये ऑक्सिजनशिवाय २४ जणांचा मृत्यू झाला. याला जबाबदारही रोहिणी आहेत. असे १९ आरोप केले आहेत.

या दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या जोरदार आरोपांमूळे नोकरशाही वर्तुळात खळबळ उडाली आहे. काल (दि.१९) मुख्यमंत्री बोम्मई यांनी ही "वैयक्तिक बाब" असल्याचे म्हंटले आहे. परंतु लढा अधिकच चिघळत असल्याने त्यांना हस्तक्षेप करावा लागेल असं सोशल मीडियावर बोललं जात आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news