Asaduddin Owaisi | AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील निवास्थानी दगडफेक | पुढारी

Asaduddin Owaisi | AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील निवास्थानी दगडफेक

पुढारी ऑनलाईन : AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. रविवारी (दि.२०) संध्याकाळी ही घटना घडली. कथित घटना घडली तेव्हा ओवेसी हे निवास्थानी उपस्थित नव्हते, ही माहिती स्वत: ओवेसी यांनी ट्विटरवरून दिली आहे. यासंदर्भात कारवाई सुरू असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

ओवेसींच्या दिल्ली येथील निवास्थाना मागील बाजूच्या प्रवेशद्वारावर काही विटा आणि दगडे सापडली आहेत. तसेच खिडक्यांच्या काचा देखील फुटल्या असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेविषयी ट्विटमध्ये असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे की, माझ्या दिल्लीतील निवासस्थानावर पुन्हा हल्ला झाला आहे. 2014 नंतरची ही चौथी घटना आहे. आज रात्री मी जयपूरहून परत आलो तेव्हा मला माझ्या घरातील नोकराने सांगितले की, अज्ञातांच्या टोळीने दगडफेक केली ज्यामुळे खिडक्यांच्या काचा फुटल्या. यावर @DelhiPolice नी त्यांना त्वरित पकडले पाहिजे, असेही देखील ओवेसींनी म्हटले आहे.

ओवेसी यांच्या तक्रारीनंतर, अतिरिक्त डीसीपींच्या नेतृत्वाखाली दिल्ली पोलिसांच्या पथकाने त्यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि घटनास्थळावरून काही पुरावे गोळा केले. यावेळी ओवेसी म्हणाले की, उच्च सुरक्षा क्षेत्रात ही दगडफेक घडली आहे, त्यामुळे दिल्ली पोलिसांनी तात्काळ तपास करत या आरोपींना त्वरित पकडण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा:

Back to top button