गुलशन ग्रोवर
गुलशन ग्रोवर

माझे करिअर संपवण्याचा प्रयत्न ! : गुलशन ग्रोवर

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूडमधील बॅडमॅन अभिनेते गुलशन ग्रोवर यांनी ८० च्या दशकात अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीच्या चित्रपटांत ते मुख्य अभिनेत्याचा मित्र किंवा भावाच्या भूमिकेत दिसले; मात्र त्यांनी खलनायकाची भूमिका साकारायला सुरुवात केली, तेव्हा सर्वजण थक्क झाले.

त्यावेळी प्रेम चोप्रापासून पंकज धीर, मुकेश ऋषी, आशुतोष राणा आणि रजा मुराद यासारखे खलनायक होते. आता त्यांनी इंडस्ट्रीबद्दल बरेच खुलासे केले आहेत. गुलशन ग्रोवर यांनी सांगितले की, कशा पद्धतीने एका निर्मात्याने त्यांना बोलावून चित्रपटात मुख्य भूमिकेची ऑफर दिली होती. मात्र, ती भूमिका एका अटीवर देण्यात आली होती. ती अट अशी होती की, गुलशन ग्रोवर तोपर्यंत कोणत्याच अन्य चित्रपटात खलनायकी भूमिका साकारणार नाही, जोपर्यंत त्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होणार नाही.

माझे करिअर संपवण्यासाठी प्रतिस्पर्ध्यानी हा कट रचला होता; मात्र त्यात ते यशस्वी झाले नाहीत, असे गुलशन यांनी नमूद केले. गुलशन ग्रोवर यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त भूमिका साकारल्या आणि नाव कमावले.

logo
Pudhari News
pudhari.news