IPL Media Rights Auction : आयपीएल मीडिया राईट्ससाठी 44,075 कोटींची बोली! ‘रिलायन्स’ की ‘स्टार’; कुणी मारली बाजी?

IPL Media Rights Auction : आयपीएल मीडिया राईट्ससाठी 44,075 कोटींची बोली! ‘रिलायन्स’ की ‘स्टार’; कुणी मारली बाजी?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL Media Rights Auction : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या पुढील पाच हंगामांसाठी (2023 ते 2027) मीडिया हक्कांच्या लिलावाचा सोमवार हा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात, भारतीय उपखंडासाठी टीव्ही आणि डिजिटल अधिकार विकले गेले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, टीव्हीचे हक्क प्रति सामना 57 कोटी आणि डिजिटलचे हक्क 48 कोटी प्रति सामन्याला विकले गेले आहेत. त्यांची एकूण बोली 43,255 कोटी आहे. टीव्ही पॅकेज 23,575 कोटी रुपयांना आणि डिजिटल पॅकेज 19,680 कोटी रुपयांना विकले गेले.

दरम्यान, खरेदीदाराचे नाव उघड करण्यात आलेले नाही. गेल्या लिलावात हे हक्क स्टारने 16,348 कोटींना विकत घेतले होते. अशा स्थितीत यावेळचे टीव्ही आणि डिजिटल हक्क गेल्या वेळेपेक्षा अडीच पट अधिक आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी रविवारपर्यंत बोलीची रक्कम 43 हजार 50 कोटींवर गेली होती. त्यात आणखी वाढ होऊ शकते. सर्वाधिक बोली कोणी लावली याचा खुलासा करण्यात आलेला नाही. हक्क जिंकणाऱ्या कंपनीचे नाव आज जाहीर केले जाऊ शकते. (IPL Media Rights Auction)

प्रति सामना 105.5 कोटी

सूत्रांनी सांगितले की, आता बीसीसीआयला आयपीएलच्या एका सामन्यासाठी 105.5 कोटी रुपये मिळणार आहेत. अशाप्रकारे, एका सामन्याच्या प्रसारण अधिकारानुसार, आयपीएल आता जगातील दुसरी सर्वात महागडी लीग बनली आहे. IPL ने EPl (रु. 86 कोटी प्रति सामना) वर मात केली आहे. आता फक्त अमेरिकेची नॅशनल फुटबॉल लीग (NFL) आयपीएलच्या पुढे आहे. NFL ला प्रत्येक सामन्याच्या प्रसारण अधिकारासाठी 133 कोटी रुपये मिळतात. (IPL Media Rights Auction)

आणखी वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news