

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघ आज दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी सज्ज झाला असतानाचं भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली समुद्रकिनारी सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. कपिल देव, ब्रेट ली, सुनील गावसकर यांनी विराट कोहली थकला आहे, त्याला विश्रांतीची गरज असल्याचे म्हटले होते. त्यानंतर विराट कोहली मालदीवमधील समुद्रकिनारी सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. आता विराट कोहली इंग्लंड विरूद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यात खेळताना दिसेल. विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सुट्टीचा आनंद घेत असलेले फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये विराट कोहली समुद्रकिनारी बसलेला दिसत आहे.
विराट कोहली सोशल मीडीयावरही सक्रीय असतो. विराट कोहलीने शेअर केलेल्या फोटोंना एका तासांत १५ लाख लाइक्स आले आहे. इंस्टाग्रामवर विराट कोहलीला भारतात सर्वांधिक पसंती आहे. त्याचे भारतात सर्वांधिक फॉलोवर्स आहेत. खेळाडूंमध्ये विराट कोहली फॉलअर्सच्या बाबतीत जगात पाचव्या क्रमांकावर आहे. या अगोदर अनुष्का शर्माने देखील तिचे बीचवरिल फोटो शेअर केले होते. शेअर केलेल्या फोटोंना तिने कॅप्शन दिले होते की, जेव्हा आपण आपले फोटो स्वत: काढतो. मीडीयाच्या मते, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. (Virat Kohli in Maldive)
विराट कोहलीने फोटो शेअर केला तेव्हा त्याला काहीही कॅप्शन दिलेले नाही. पण लोकांनी या फोटोवर जबरदस्त कमेंट्स केल्या आहेत. विराट कोहलीचे इंस्टाग्रामवर नुकतेच २०० मिलियन फॉलॉयर्स पुर्ण झाले होते. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी या खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय संघ या मालिकेनंतर इंग्लंडच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. (Virat Kohli in Maldive)