IPL 2024 PBKS vs DC : होम ग्राउंडवर पंजाबचा डंका, दिल्‍लीवर चार गडी राखत विजय

सॅम करनने आयपीएल कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले. त्याने 39 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्‍याची ६३ धावांची खेळी निर्णायक ठरली.
सॅम करनने आयपीएल कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले. त्याने 39 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्‍याची ६३ धावांची खेळी निर्णायक ठरली.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडियन प्रीमियर लीग ( IPL 2024 ) स्‍पर्धेतील दुसरा सामना आज ( दि. २३ मार्च ) दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झाला. आपल्‍या होम ग्राउंडवर पंजाब संघाने चार गडी राखत विजय मिळवला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 9 गडी गमावून 174 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबने 19.2 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. आयपीएलच्या 17 व्या मोसमाची पंजाबने विजयाने सुरुवात केली आहे. दरम्‍यान, आजच्‍या सामन्‍याचे दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने सर्वांचे लक्ष वेधले हाेते. त्‍याने तब्बल 15 महिन्यांनंतर क्रिकेट मैदानावर पुनरागमन केले. ( IPL 2024 PBKS vs DC )

IPL 2024 PBKS vs DC : दिल्‍लीचे पंजाबसमोर १७४ धावांचे आव्‍हान

पंजाबने नाणेफेक जिंकली. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 174 धावा केल्या. प्रअभिषेक पोरेलने हर्षल पटेलच्या 20व्या षटकात 25 धावा दिल्या. त्याने 10 चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 32 धावा केल्या. पोरेलने 20 व्या षटकात तीन चौकार आणि दोन षटकार मारले. शेवटच्या चेंडूवर कुलदीप दोन धावा काढून धावबाद झाला. 19व्या षटकापर्यंत दिल्लीची धावसंख्या आठ गड्यांच्या मोबदल्यात 149 धावा होती आणि पोरेलच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर संघाने 174 धावांपर्यंत मजल मारली होती.

IPL 2024 PBKS vs DC :  पंजाबची सावध सुरुवात

१७४ धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्जला चौथ्या षटकात 34 धावांवर पहिला धक्का बसला. डावाच्या चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर इशांत शर्माने शिखर धवनला क्लीन बोल्ड केले. धवनने 16 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 22 धावांची खेळी केली. यानंतर, पाचव्या चेंडूवर, प्रभासिमरनने सरळ शॉट खेळला जो इशांतच्या बोटाला लागला आणि नॉन-स्ट्रायकरच्या शेवटी विकेटवर आदळला. त्यानंतर बेअरस्टो क्रीझबाहेर असताना तो धावबाद झाला. बेअरस्टो तीन चेंडूत नऊ धावा करून बाद झाला. पॉवरप्ले ( डावाची पहिली सहा षटके ) मध्‍ये संपली. पंजाबने दोन गडी गमावून ६० धावा केल्या.

पंजाब किंग्जला 10व्या षटकात 84 धावांवर तिसरा धक्का बसला. कुलदीप यादवने प्रभसिमरन सिंगला वॉर्नरकरवी झेलबाद केले. त्याला 17 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने 26 धावा करता आल्या. पंजाबला 12 व्या षटकात 100 धावांवर चौथा धक्का बसला. विकेटकीपर ऋषभ पंतने अप्रतिम कौशल्य दाखवत कुलदीपच्या चेंडूवर जितेश शर्माला यष्टिचित केले. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न करताना जितेश क्रीझच्या बाहेर आला. चेंडू चुकला आणि पंतच्या ग्लोव्हजमध्ये गेला. एकही संधी वाया न घालवता पंतने चेंडू स्टंपवर मारला. जितेश नऊ धावा करून बाद झाला. 12 षटकांनंतर पंजाबची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात 103 धावा आहे. सध्या लियाम लिव्हिंगस्टोन आणि सॅम करन क्रीजवर आहेत.

IPL 2024 PBKS vs DC :  सॅम करनचे अर्धशतक

मिचेल मार्श 15 वे षटकात सामना पंजाबकडे झुकला. सॅम करन आणि लियाम लिव्हिंगस्टोन या जोडीने 18 धावा केल्या. सॅम करनने आयपीएल कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले. त्याने 39 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्‍याची ६३ धावांची खेळी निर्णायक ठरली. १९व्‍या षटकात पंजाबला सलग दोन धक्‍के बसले. अखेरच्‍या षटकातील दुसर्‍या चेंडूवर लियाम लिव्हिंगस्टोनने षटकार मारून सामना संपवला. त्‍याने २१ चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ३८ धावांची खेळी केली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news