IPL 2024 Ajinkya Rahane Catch | रहाणे- रचिन रवींद्रची जबरदस्त फिल्डिंग, विराटला केले बाद; व्हिडिओ व्हायरल | पुढारी

IPL 2024 Ajinkya Rahane Catch | रहाणे- रचिन रवींद्रची जबरदस्त फिल्डिंग, विराटला केले बाद; व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या 2024 हंगामाला दमदार सुरूवात झाली आहे. 17व्या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. सामन्यात सीएसकेच्या क्षेत्ररक्षणाची जादू पाहायला मिळाली. अजिंक्य रहाणे आणि रचिन रवींद्र यांनी जबरदस्त झेल घेत विराट कोहलीला बाद केले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोघे जबरदस्त फिल्डिंग करताना दिसत आहेत. (IPL 2024 Ajinkya Rahane Catch)

आयपीएलचा पहिला सामना चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीची फलंदाजी चेन्नईच्या मारक गोलंदाजांसमोर झुंजताना दिसत होती. मात्र, दिनेश कार्तिक आणि अनुज रावत यांनी 90 हून अधिक धावांची भागीदारी करत बेंगळुरूला 173 धावांपर्यंत नेले. प्रत्युत्तरात चेन्नईने चार गडी गमावून लक्ष्य गाठले. (Ajinkya Rahane Catch)

रहाणे- रचिन रवींद्रची जबरदस्त फिल्डिंग

सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंची जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. चेन्नईचे खेळाडू फिल्डिंग करताना आरसीबीच्या डावाच्या 12व्या षटकात एक घटना घडली. मुस्तफिझूर रहमानच्या बॉलवर विराटने षटकार लगावण्यासाठी आक्रमक फटका मारला. परंतु, मुस्तफिजुरने स्लोअर बॉल केल्यामुळे विराटच्या शॉटला गती मिळाली नाही. यामुळे बॉल मैदानाच्या आतच राहिला. यावेळी अजिंक्य रहाणेने रचिनसोबत जबरदस्त फिल्डिंग करून विराटला झेलबाद केले. चेन्नईच्या दोन्ही खेळाडूंच्या दमदार फिल्डिंगने चाहत्यांची मने जिंकली.

पहिल्याच सामन्यात रहमानचा अचूक मारा

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीकडून कर्णधार फाफ डू फ्लेसिसने स्फोटक खेळी केली. डू फ्लेसिसने दीपक चहरवर हल्ला चढवत चौकार ठोकले. आरसीबीची गाडी सुसाट धावत असताना मुस्तफिजूर रहमानने या गाडीला ब्रेक लावला. डावाच्या 41 धावांवर आरसीबीने कर्णधाराच्या रूपात आपला पहिला गडी गमावला. डू फ्लेसिसने 8 चौकारांसह 35 धावा केल्या. त्यानंतर त्याच षटकात रजत पाटीदार एकही धाव न करता तंबूत परतला. पुढच्या षटकात दीपक चहरने ग्लेन मॅक्सवेल (0) आणि मुस्तफिजूरने कॅमेरून ग्रीनला (18) आपल्या जाळ्यात फसवले. विराट कोहलीने संथ खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या वाटेत अजिंक्य रहाणे आला. मुस्तफिजूरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात असलेल्या विराटचा रहाणेने अप्रतिम झेल घेतला. सीमारेषेच्या दिशेने चेंडू कूच करत असताना त्याने झेल टिपला अन् त्याच्या मदतीला रचिन रवींद्र धावला. दोघांनी मिळून झेल पूर्ण केला. विराट कोहली 20 चेंडूंत 21 धावा करून बाद झाला. यानंतर 12व्या षटकात कोहलीशिवाय रहमानने कॅमेरून ग्रीनला आपला शिकार बनवले.

हेही वाचा :

Back to top button