IPL 2024 : इशांतच्या ‘यॉर्कर’समोर रसेलचे लोटांगण! आऊट झाल्‍यावर दिली ‘अशी’ प्रतिक्रिया ( पाहा व्‍हिडिओ )

कोलकाताविरुद्‍धच्‍या सामन्‍यात  दिल्‍लीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने टाकलेल्‍या यॉर्करवर रसेल क्‍लीन बोल्‍ड झाला. या विकेटचा व्‍हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्‍हायरल होत आहे.
कोलकाताविरुद्‍धच्‍या सामन्‍यात दिल्‍लीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने टाकलेल्‍या यॉर्करवर रसेल क्‍लीन बोल्‍ड झाला. या विकेटचा व्‍हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्‍हायरल होत आहे.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडियन प्रीमियर लीग ( IPL 2024) स्‍पर्धेत बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स आमने-सामने होते. या सामन्‍यातील दिल्‍लीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने टाकलेल्‍या यॉर्करहा चर्चेचा विषय ठरला आहे. इंशाच्‍या भेदक गोलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ( IPL 2024 : Andre Russell Was Hit By Ishant Sharmas Yorker )

इशांतच्या यॉर्करवर रसेल चारीमुंडया चीत

कोलकात्याच्या डावातील 20 वे षटक इशांत शर्माने टाकले. षटकातील पहिला चेंडू यॉर्कर होता, त्यावर रसेलचा तोल गेला आणि तो मैदानावर काेसळला. नेमकं काय घडलं? हे क्षणभर रसेला कळाले नाही. तो क्‍लीन बोल्‍ड झाला हाेता. यानंतर त्याने टाळ्या वाजवून ईशानच्‍या भेदक चेंडूचे कौतुक केले. या सामन्‍यात रसेल याने 19 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 41 धावा केल्या.
( IPL 2024 : Andre Russell Was Hit By Ishant Sharmas Yorker )

कोलकाताने नाेंदवला सलग तिसरा विजय

बुधवारी झालेल्‍या सामन्‍यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने दमदार कामगिरी केली. त्यांनी 20 षटकात सात गडी गमावत तब्‍बल 272 धावा केल्या. ही धावसंख्‍या आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा 106 धावांनी पराभव केला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 20 षटकांत 7 गडी गमावून 272 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ 17.2 षटकांत 166 धावांवर गारद झाला. यंदाच्‍या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाने मुंबई इंडियन्सविरोधातील सामन्‍यात २७७ धावा केल्‍या होत्‍या. दिल्लीचा चार सामन्यांतील हा तिसरा पराभव आहे. यासोबतच कोलकाताने विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. संघाने आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत. ( IPL 2024 : Andre Russell Was Hit By Ishant Sharmas Yorker )

काेलकाता गुणतालिकेत अव्वल स्थानी

बुधवारच्‍या विजयामुळे कोलकाता संघ सहा गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी दिल्लीचा संघ नवव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचे दोन गुण आहेत. कोलकाताचा आता 8 एप्रिल रोजी चेन्नई विरुद्ध सामना होणार आहे. तर दिल्लीचा संघ आपला पुढचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध ७ एप्रिलला वानखेडेवर खेळणार आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news