IPL 2024 : केएल राहुलला झटका, LSGचा वेगवान गोलंदाज आयपीएलमधून बाहेर | पुढारी

IPL 2024 : केएल राहुलला झटका, LSGचा वेगवान गोलंदाज आयपीएलमधून बाहेर

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 : आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी)साठी वाईट बातमी समोर आली आहे. या संघाचा वेगवान गोलंदाज शिवम मावी दुखापतग्रस्त झाल्याने आयपीएल 2024 मधून बाहेर पडला आहे. एलएसजीने याबाबत अधिकृत निवेदन जारी करून याची माहिती दिली आहे. मात्र, त्याच्या जागी कोणाचीही निवड केली जाईल याबाबत खुलासा केलेला नाही.

एलएसजीने निवेदनात म्हटलंय की, ‘फ्रँचायझी शिवम मावीच्या पाठीशी राहील. तंदुरुस्त होण्यासाठी त्याला सर्वतोपरी मदत केली जाईल. त्याचे लवकरात लवकर पुनरागमन होईल असा आम्हाला विश्वास आहे.’ एलएसजी सध्या तीनपैकी दोन सामने जिंकून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. (IPL 2024)

मावीच्या अनुपस्थितीत एलएसजीकडे मॅट हेन्री, शामर जोसेफ, मोहसीन खान, मयंक यादव, यश ठाकूर, अर्शद खान आणि युधवीर सिंग यांच्या रूपात वेगवान गोलंदाजीचे पर्याय आहेत.

एलएसजीने शिवम मावीला 6.40 कोटी रुपयांना खरेदी केले होते. डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या लिलावानंतर शिव मावी संघाच्या प्री-सीझन कॅम्पचा भाग होता. मात्र, तो अनफिट राहिल्याने यंदाच्या आयपीएल हंगामात एकही सामना खेळू शकला नाही. (IPL 2024)

मावीची प्रतिक्रिया..

आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर शिवम मावीने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, ‘माझा एलएसजी संघ खूप चांगला आहे. स्पर्धेत आम्ही अव्वल राहू अशी आशा आहे. मी जरी स्पर्धेतून बाहेर पडलो असलो तरी मी संघाला चीअर करत राहणार आहे.’

मावीची आयपीएल कारकीर्द

गेल्या मोसमातही मावीने एकही सामना खेळला नाही. तो आयपीएल 2022 मध्ये केकेआरकडून खेळताना दिसला होता. त्या मोसमात, त्याने 6 सामन्यात 10.32 च्या इकॉनॉमी रेटने 5 विकेट घेतल्या होत्या. त्याच्या आयपीएल कारकिर्दीत त्याने 32 सामन्यांत 31.40 च्या सरासरीने आणि 8.71 च्या इकॉनॉमी रेटने 32 विकेट घेतल्या आहेत. 21 धावांत 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

Back to top button