IPL 2023 Playoffs CSK vs GT : गुजरात की चेन्‍नई? फायनलमध्‍ये कोण धडक मारणार? जाणून घ्‍या कोणाचे पारडे जड

IPL 2023 Playoffs CSK vs GT : गुजरात की चेन्‍नई? फायनलमध्‍ये कोण धडक मारणार? जाणून घ्‍या कोणाचे पारडे जड

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएल) २०२३ स्‍पर्धा आता अंतिम टप्‍प्‍यात आली आहे. साखळी सामन्‍यात उत्‍कृष्‍ट कामगिरी केलेल्‍या चार संघांनी 'प्‍ले-ऑफ'मध्‍ये धडक मारली आहे. आजपासून (दि. 23) 'प्ले-ऑफ' लढतींचा थरार सुरू होणार आहे. क्वॉलिफायर-1 साठी आज गुजरात आणि चेन्नई संघ आमने-सामने  येणार आहेत. जाणून घेवूया या लढतीत कोणत्‍या संघाचे पारडे जड आहे याविषयी.

चेन्‍नई सुपर किंग्‍ज म्‍हणजे महेंद्रसिंह धोनी इतके घट्ट समीकरण आहे. क्रिकेटमधील एक उत्कृष्‍ट रणनीतीकार अशी महेंद्रसिंग धोनी याची ओळख आहे. आज चेन्‍नईत घरच्‍या चेपॉक स्‍टेडियमवर गुजरातशी मुकाबला करताना धाेनीची रणनीती महत्त्‍वाची ठरणार आहे. आजचा सामना जिंकणार संघ आयपीएल फायनलमध्‍ये धडक मारेल. तर पराभूत झालेला संघ हा बुधवारी लखनौ आणि मुंबई संघातील विजेत्‍या संघाबरोबर शुक्रवारी क्वॉलिफायर-2 साठी सामना खेळेल. यानंतर क्वॉलिफायर-1मधील विजेता व क्वॉलिफायर-2मधील विजेता संघ रविवारी, २८ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळतील.

IPL 2023 Playoffs CSK vs GT : यंदा चेपॉकवर गुजरात प्रथमच खेळणार

दोन्‍ही संघांनी उत्‍कृष्‍ट कामगिरी करत 'प्‍ले-ऑफ'मध्‍ये धडक मारली आहे. त्‍यामुळे आजच्‍या सामन्‍यासाठी दोन्‍ही संघांमध्‍ये कोणताही बदल होणार नाही असे मानले जात आहे. यंदाच्‍या आयपीएल हंगामात गुजरात टायटन्सने चेपॉकवर एकही सामना खेळलेला नाही. त्‍यामुळे गुजरातसमोर निश्‍चित हे आव्‍हान असेल. तसेच आपल्‍या घरच्‍या चेपाॅक  मैदानावर खेळताना चेन्‍नई संघ अधिक जाेरकस कामगिरी करेल असे मानले जात आहे.

IPL 2023 Playoffs CSK vs GT : नेहमीच गुजरातचे पारडे जड

गुजरात टायटन्‍स आणि चेन्‍नई सुपर किंग्‍ज हे आतापर्यंत तीनवेळा आमने-सामने आले आहेत. हे तिन्‍ही सामने गुजरातने जिंकले आहेत. त्‍यामुळे आजचा सामना हा चेन्नईसाठी एक आव्‍हान असणार आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या हा चेन्नईचा कर्णधार धोनीला आपला गुरु मानतो. यंदाच्‍या मोसमातील पहिल्‍याच सामन्‍यात शिष्‍याने बाजी मारली होती. हा सामना गुजरातने पाच गडी राखून जिंकला होता. आता सेमीफायनलमध्‍ये गुरु जिंकणार की शिष्‍य बाजी मारणार हे काही तासांमध्‍ये स्‍पष्‍ट हाेईल.

IPL 2023 Playoffs CSK vs GT : खेळपट्टीवरही बरेच काही अवलंबून

आजवर चेपॉक स्‍टेडियमवर चेन्नई संघाने सात सामने खेळले आहेत. या स्‍टेडियमवरील खेळपट्टी नेहमीच वेगळी राहिली आहे. आजच्‍या सामन्‍यातही बरेच काही खेळपट्टीवर अवलंबून असेल, असे मानले जात आहे. अर्थात दोन्‍ही संघ खेळपट्टीनुसारच आपली रणनीती आखतील. विशेष म्‍हणजे दोन्‍ही संघाचे रणनीतकार हे कुशल आहेत. आज फायनलमध्‍ये धडक मारण्‍यासाठी काेणाची रणनीती अधिक अचूक ठरणार हे पाहावे लागणार आहे. आज खेळपट्टी सपाट असेल तर फिरकीपटूंची कामगिरी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. चेन्नईकडे रवींद्र जडेजा, मोईन अली आणि तिक्ष्णा हे दर्जेदार फिरकी गोलंदाज  आहेत. तर गुजरात टायटन्सची भिस्‍त रशीद आणि नूर अहमद यांच्‍यावर असेल.  रशीद आणि नूर यांनी या हंगामात उत्‍कृष्‍ट गाेलंदाजीचे प्रदर्शन केले आहे.

शुभमन गिलचा 'फॉर्म' गुजरातसाठी गूड न्‍यूज

गुजरात टायटन्‍स संघाचा सलामीवीर शुभमन गिल सध्‍या उत्‍कृष्‍ट फलंदाजीचे प्रदर्शन करत आहे. संघासाठी ही जमेची बाजू आहे. रॉयल चॅलेंजर्सविरुद्‍ध गेल्या सामन्यात शुभमनने नाबाद शतक झ्रळकावले. आज फायनलमध्‍ये चेन्नईविरुद्धच्या सामन्यात सर्वांच्या नजरा त्‍याच्‍या फलंदाजीकडे असणार आहेत. शुभमनला रोखण्‍यासाठी चेन्‍नईचा कर्णधार धोनीकडे त्याच्यासाठी निश्चितच खास रणनीती असल्‍याचे मानले जात आहे. पॉवरप्लेमध्ये दीपक चहरची गोलंदाजी आणि डेथ ओव्हर्समध्ये मथिशा पाथिरानाची कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असेल.

कॉनवे आणि ऋतुराजच्‍या कामगिरीवर असेल चेन्नईचे लक्ष

चेन्‍नईचे सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड हे आज कशी कामगिरी करतात हे महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे. तसेच चेपॉकवर अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबेच्‍या फलंदाजीकडे चेन्‍नईचे विशेष लक्ष असेल. गुजरातचा अनुभवी मोहम्मद शमी आणि राशिद खान यांचे आव्‍हान चेन्‍नईच्‍या फलंदाजांसमोर असणार आहे. शनाकाचा अष्टपैलू म्हणून वापर केला जाऊ शकतो पण नाणेफेकीचा विचार करता डावखुरा फिरकीपटू आर साई किशोरचाही विचार हाेईल असे मानले जात आहे.

दोन्ही संघांचे संभाव्य खेळाडू

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (केंद्रीय फलंदाज), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश टेकशाना (इम्पॅक्ट प्‍लेअर : मथिशा पाथिराना)

गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पंड्या (क), साई सुदर्शन/विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, यश दयाल (इम्पॅक्ट प्‍लेअर : जोशुआ लिटल) /दासुन शनाका))

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news