IPL 2023 : मैदानात न उतरताच कोट्यधीश झालेले खेळाडू!

IPL 2023 : मैदानात न उतरताच कोट्यधीश झालेले खेळाडू!
Published on
Updated on

नवी दिल्ली : रविवारी चेन्नईच्या जेतेपदासह सांगता झालेल्या आयपीएल हंगामात यंदा अनेक खेळाडूंनी आपल्या शानदार खेळासह अनेक पुरस्कार जिंकले, चाहत्यांची मने जिंकली. पण, काही खेळाडू असेही राहिले, जे न खेळता, राखीव खेळाडूत बसूनही कोट्यधीश झाले! गुजरातच्या संघात तर असे 4 खेळाडू होते, ज्यांना एक तरी टीम कॉम्बिनेशनमध्ये जागा मिळाली नाही किंवा संघव्यवस्थापनाने त्यांच्यावर विश्वास दाखवला नाही. याचीच एक छोटीशी झलक… (IPL 2023)

शिवम मावी (गुजरात)

जलद गोलंदाज शिवम मावीला यंदा 6 कोटी रुपयांना करारबद्ध करण्यात आले. पण, मावीला अखेरर्पंयत या हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. या संघात मोहम्मद शमी, मोहित शर्मा, जोश लिटल, अल्झारी यांनी जलद गोलंदाजीची आघाडी समर्थपणे हाताळली तर राशिद व नूर अहमद यांनी फिरकीत साम—ाज्य गाजवले. यामुळे देखील मावीला शेवटपर्यंत राखीव खेळाडूंमध्येच बसून राहावे लागले. (IPL 2023)

मॅथ्यू वेड (गुजरात)

ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक मॅथ्यू वेडला यंदा गुजरात टायटन्सने 2.40 कोटी रुपयांना करारबद्ध केले. मात्र, या दिग्गज खेळाडूला देखील एकही सामना खेळण्याची संधी लाभली नाही. यापूर्वी मॅथ्यू वेडने दोन हंगामांत आयपीएल सहभाग नोंदवला असला तरी त्याला फारसे यश लाभलेले नाही. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने खराब फॉर्ममुळे त्याच्यावर विश्वासच दाखवला नाही. साहजिकच, हा खेळाडू देखील राखीवमध्येच बसून राहिला.

साई किशोर (गुजरात)

3 कोटी रुपयांना करारबद्ध या फिरकीपटूला देखील गुजरातने संधी दिली नाही. या संघातील दुसरा फिरकीपटू नूर अहमदने अव्वल गोलंदाजी साकारत सातत्याने प्रतिस्पर्ध्यांवर दडपण राखले. यामुळे देखील साई किशोरला गुजरात संघात स्थान मिळू शकले नाही. नूर अहमदने या हंगामात 13 सामन्यांत 16 गडी बाद करण्याचा पराक्रम गाजवला.

के.एस. भरत (गुजरात)

गुजरात टायटन्सने 1.20 कोटी रुपयांना करारबद्ध केलेला के.एस. भरत देखील यंदा राखीव खेळाडूंमध्येच बसून राहिला. कसोटी क्रिकेटमध्ये राखीव यष्टिरक्षक राहिलेल्या के.एस. भरतला छोटेखानी क्रिकेट प्रकारासाठी योग्य मानले गेले नाही, असेच निवडीवरून स्पष्ट होत राहिले. गुजरातकडे या हंगामाच्या प्रारंभापासूनच वृद्धिमान साहासारखा दमदार पर्याय उपलब्ध होता आणि यामुळे त्यांना के.एस. भरतला संधी देण्याची आवश्यकता भासली नाही. साहाने गुजरातसाठी उत्तम योगदान दिले आहे.

डेव्हॉल्ड ब—ेविस (मुंबई)

'बेबी एबी' या नावाने लोकप्रिय असलेल्या डेव्हॉल्ड ब—ेविसला यंदा मुंबई इंडियन्सने 3 कोटी रुपयांना करारबद्ध केले. पण, ब—ेविसला त्यांनी एकही सामना खेळण्याची संधी दिली नाही. ब—ेविस हा आघाडीचा फलंदाज आहे. या हंगामात मुंबईतर्फे सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड व इशान किशन उपलब्ध असल्याने ब—ेविसला संधी मिळू शकली नाही.

हेही वाचा; 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news