IPL 2022 RCB vs GT : ‘आरसीबी’साठी आजचा सामना ‘करो या मरो’, प्‍ले ऑफसाठी मोठ्या फरकाने विजयाची गरज 

IPL 2022 RCB vs GT : ‘आरसीबी’साठी आजचा सामना ‘करो या मरो’, प्‍ले ऑफसाठी मोठ्या फरकाने विजयाची गरज 
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आयपीएल २०२२ स्‍पर्धा आता अंतिम टप्‍प्‍यात आली आहे. आज स्‍पर्धेतील ६७ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ( आरसीबी) आणि गुजरात टायटन्‍स (जीटी) संघात रंगणार आहे. गुजरात संघाने १३ पैकी १० सामने जिंकत गुणतालिकेत २० अंक आपल्‍या नावावर करत प्‍ले ऑफमधील आपले स्‍थान निश्‍चित केले आहे. तर 'आरसीबी' संघ १३ सामन्‍यांपैकी सात सामने जिंकत पाचव्‍या स्‍थानावर आहे. प्‍ले ऑफमध्‍ये जाण्‍यासाठी आज रात्री साडेसात वाजता वानखेडे स्‍टेडियमवर होणारा सामना 'आरसीबी'साठी 'करो या मरो' असा असेल.

IPL 2022 RCB vs GT : 'आरसीबी'ला सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागले

दिल्‍ली कॅपिटल्‍स संघाला पिछाडीवर टाकत प्‍ले ऑफमध्‍ये आपले स्‍थान पक्‍के करण्‍यासाठी आरसीबीला आजचा सामना जिंकावाच लागणार आहे. तसेच हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. दिल्‍ली आणि बंगळूर या दोन्‍ही संघाचे गुण १४ आहेत. दिल्‍ली संघाचाही एक सामना बाकी आहे. दिल्‍लीचा मुकाबला मुंबईबरोबर आहे.  मुंबईला हरविल्‍यास दिल्‍लीच्‍या अंकावर १६ गुण होतील.बंगळूर आणि दिल्‍ली यांनी आपले साखळी सामन्‍यांमधील अखेरचा सामना जिंकला तर दोन्‍ही संघाच्‍या नावावर १६ गुण होतील. यानंतर रेनरेटच्‍या आधारे फ्‍ले ऑफचा निर्णय होणार आहे. त्‍यामुळे दोन्‍ही संघांना आपले सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत.

आरसीबीचा कर्णधार फाफ डु फ्‍लेसिस चांगल्‍या फॉर्ममध्‍ये आहे. आज सर्वांच्‍या नजरा त्‍याच्‍या फलंदाजीकडे असणार आहेत. मात्र वेगवान गोलंजाद हेजलवूड यांची खराब कामगिरी हा आरसीबीसाठी चिंतेचा विषय आहे. तसेच आजच्‍या विराट कोहलीच्‍या खेळीकडे चाहत्‍याचे लक्ष वेधले ओ.

गुणतालिकेत गुजरात टायटन्‍स पहिल्‍या क्रमांकावर आहे. आयपीएल 'प्‍ले ऑफ'मध्‍ये पोहचणारा हा पहिला संघ ठरला आहे. या संघातील धडाकेबाज फलंदाज शुभमन गिल पुन्‍हा एकदा फॉर्ममध्‍ये आहे. कर्णधार हार्दिक पांड्या आजच्‍या सामन्‍यापासून पुन्‍हा एकदा गोलंदाजीला सुरुवात करण्‍याची शक्‍यता आहे. तसेच वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्यूसन आफिण रशिद खानची फिरकी यांचा सामना करण्‍याचे आव्‍हान 'आरसीबी' समोर असणार आहे.

यंदाच्‍या आयपीएल स्‍पर्धेत बंगळूर आणि गुजरात संघ एकदाच आमने-सामने आले. ३० एप्रिल रोजी झालेल्‍या या सामन्‍यात आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना १७१ धावा केल्‍या होत्‍या. गुजरातने चार विकेट आणि तीन चेंडू बाकी ठेवत हा सामना सहज जिंकला होता. या सामन्‍यात राहुल तेवतिया याने ४३ धावा केल्‍या होत्‍या. आता फ्‍ले ऑफमध्‍ये जाण्‍यासाठी गुजरातच्‍या आव्‍हानाला बंगळूर कसे सामोरे जाणार, याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष वेधले आाहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news