International Happiness Day : आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे

International Happiness Day
International Happiness Day
पुढारी ऑनलाईन डेस्क : आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे…ही बालकवींची कविता किंवा सकाळी-सकाळी संत तुकाराम महाराज यांचा 'आनंदाचे डोही आनंद तरंग' हा अभंग ऐकला आहे का? हे गुणगुणायला पण आपल्याला भारी वाटतं. हा आनंद पण निराळाच असतो ना. पण एवढं का सांगत आहोत असं तुम्हाला वाटेल; तर आज आहे आंतरराष्ट्रीय आनंदी दिन. २०१३ पासुन हा दिवस साजरा केला जातो. (International Happiness Day ) पाहूया आंतरराष्ट्रीय आनंदी दिनानीमित्त आनंदी राहण्याचे फंडे.

International Happiness Day – आंतरराष्ट्रीय आनंदी दिन. 

'सुखी माणसाचा सदरा' कोणाला सापडला आहे का ओ? किंवा सुखी माणसाचा सदरा बाजारात कुठे विकत मिळतो का? तर अजिबात तसे काही नसते. तो सुखी माणसाचा प्रतिकात्मक असा सदरा आपणही मिळवु शकतो; आपल्या जगण्यातून. कोरोना सारखी जागतिक महामारी, आर्थिक चणचण, बेरोजगारी, वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठीची धडपड, गरजेपेक्षा हव्यासापोटी मिळवणे. यासारख्या बऱ्याच गोष्टींमुळे  आपण आपला आनंद गमावून बसलो आहोत का? असं अलिकाडच्या काही दिवसात लोकांना वाटु लागलं आहे. प्रत्येकाला आनंदी राहायला आवडतं असते; पण प्रत्येकाची आनंदाची संकल्पना वेगळी. एका व्यक्तीला आवडणारी गोष्ट दुसऱ्याला आवडेल असे नाही. प्रत्येकजण आनंदासाठी धडपडत असतो. जगत असताना आनंदाचे (International Happiness Day) विविध भावरंग आपल्याला पाहायला मिळतात. चला तर मग पाहूया आनंदी राहण्याचे फंडे.

१) आवडणारी गोष्ट करा. (International Happiness Day)

आपल्या आवडणाऱ्या गोष्टी करायला शिका. यासाठी पहिला तुम्हाला नेमक्या कोणत्या बाबी आवडतात हे ओळखता आलं पाहिजे. आवडते  एक गोष्ट आणि करत राहाल दुसरी गोष्ट तर नैराश्य अधिक जाणवेल. तुम्हाला नेमकं काय आवडतं हे शोधा आणि तुमचा आनंद मिळवायला शिका.  
आरोग्य जपा
आरोग्य जपा

2) आरोग्य जपा.

आरोग्यम् धनसंपदा', 'आरोग्य हीच खरी संपत्ती आहे' हे ऐकायला मिळणारे नेहमीच वाक्य. पण आपण आपल्या आरोग्याची किती काळजी करतो याचा पण आपण विचार करायला हवा. चांगल्या आरोग्यासाठी आनंदी राहणं जितकं गरजेचं असते ते आनंदी राहण्यासाठी आरोग्य महत्वपुर्ण असते. या दोन्ही गोष्टी ऐकमेकांवर अवलंबुन आहेत. या चांगल्या आरोग्यासाठी सकस आहार, व्यायाम आणि सकारात्मक विचार असणे ही त्रिसूत्री वापरात आणणे खूप गरजेचे असते.
सकारात्मक विचार.
सकारात्मक विचार.

३) सकारात्मक विचार.

आपण कसा विचार करतो…ही गोष्ट आपल्या आनंदासाठी खुप महत्त्वपूर्ण आहे. आनंदासारखी निसर्गदत्त गोष्ट मिळवायची असेल तर तुमचेही विचार देखील सकारात्मक असणे गरजेचे असते.
ताण-तणावाचे व्यवस्थापन
ताण-तणावाचे व्यवस्थापन

४) ताण-तणावाचे व्यवस्थापन 

एखाद्या आजारासारखा ताण-तणाव हा देखील एक आजार आहे; हे आपण अजुनही मान्य करत नाही. पण ताण-तणावासारख्या आजाराचे आपल्या  शरीरासाठी आणि आनंदासाठी व्यवस्थापन करता आले पाहिजे. प्रथमत: आपण ताण-तणावात आहोत का ? हे शोधुन त्याच्या कारणांचा शोध घेवुन ताण कमी करण्यास सुरुवात  करायला हवी. 
व्यायाम करा.
व्यायाम करा.

५) व्यायाम करा

दररोज व्यायाम करा. व्यायाम केल्याने तुमचं आरोग्य व्यवस्थित राहील. नियमीत व्यायाम करण्याने शरीर निरोगी राहील. शारिरीक बरोबरचं मानसिक आरोग्यही चांगले राहील. 

असे बरेच फंडे तुम्ही आनंद राहण्यासाठी करु शकता. चला तर मग आनंदी राहुया. 
हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news