International girl child day : मुलगी बापासाठी दीर्घायुष्‍याची हमी! जाणून घ्‍या नवीन अभ्‍यासातील माहिती

International girl child day : मुलगी बापासाठी दीर्घायुष्‍याची हमी! जाणून घ्‍या नवीन अभ्‍यासातील माहिती
Published on
Updated on

11 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय कन्या दिन म्हणून साजरा केला जातो. मुलगी आणि बापाचे नाते अगदी वेगळ्या स्वरूपाचे असते. नव्याने झालेल्या एका संशोधनात मुलीमुळे वडिलांना दीर्घायुष्य लाभते असे दिसून आले आहे. या अभ्यासाची माहिती देणार हा खास लेख.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : 'मुलगी झाली…' हे वाक्‍य उच्‍चारताना आजही आपल्‍याकडे थोडा निराशेचा सुरु असतोच. मात्र हा क्षण एका बापासाठी त्‍याच्‍या आयुष्‍यातील सर्वोच्‍च आनंदाच्‍या क्षणांपैकी एक ठरतो. 'पहिली बेटी धनाची पेटी', असे सांगत नातेवाईक त्‍याचे अभिनंदन करतात. आता मुलींचे बाप असणार्‍यांसाठी नवीन अभ्‍यास आनंदवार्ता घेवून आला आहे. मुली असलेले पित्‍याला मुली नसणार्‍यांपेक्षा दीर्घायुष्‍य लाभते, असा निष्‍कर्ष या अभ्‍यासात नाेंदवण्‍यात आला आहे. ( Fathers and daughter) जाणून घेवूया या नवीन संशोधनाविषयी…

Fathers and daughter : असे झाले संशोधन

मुलगी असणारे आणि केवळ मुलेच झालेल्‍या पित्‍यांचा जगिलोनियन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एक विस्तृत अभ्यास केला. या अभ्यासामध्ये २,१४७ माता आणि २,१६३ पित्‍याचा समावेश होता. ४,३१० पेक्षा अधिक जणांचा लोकसंख्याशास्त्रीय डेटा गोळा करण्‍यात आला. या माहितीचे विश्लेषण करण्‍यात आले. अपत्‍य मुलगा की मुलगी आणि त्‍याचे वडिलांच्‍या दीर्घायुष्यावर होणारे संभाव्य परिणाम याचा अभ्‍यास करण्‍यात आला.

Fathers and daughter : संशोधनात काय आढळले?

या अभ्‍यासाचा मुख्य निष्कर्ष असे सूचित करतो की, मुली असलेले वडील जास्त आयुष्य जगतात. म्‍हणजे मुली अधिक असणारे वडील हे अधिक आयुष्‍य जगण्याची शक्यता असते. जन्मलेल्या प्रत्येक मुलीसाठी वडिलांचे आयुष्य सरासरी ७४ आठवडे वाढते, असेही हा अभ्‍यास सांगतो. आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, एकूण मुलांची संख्या याचा वडिलांच्या आयुष्यावर कोणताही प्रभाव पडत नाही. मात्र केवळ मुली असणार्‍या वडील आणि दीर्घायुष्य यांच्यात एक महत्त्वपूर्ण संबंध आहे.

मुलगा असो की मुलगी आईच्‍या आरोग्‍यावर हाेताे परिणाम

मुलांच्‍या जन्‍माचा आईवर कोणत्‍या परिणाम होतो, असा प्रश्‍न तुम्‍हाला पडला असेल. तर अमेरिकन जर्नल ऑफ ह्यूमन बायोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, मुली आणि मुलगा दोघांचाही आईच्या आरोग्यावर हानिकारक प्रभाव पडतो. याचा तिच्‍या आयुष्‍यमानावरही परिणाम होतो. मात्र या दोन निष्‍कर्षांपेक्षाही एका संशोधनात असे सूचित करतो की, मुलगा असो की मुलीग दीर्घ आयुष्यासाठी मुलांचे योगदान महत्त्‍वपूर्ण ठरते. मुले असलेली जोडपी अपत्य नसलेल्‍या जोडप्‍यांपेक्षा दीर्घायुष्याचा आनंद घेण्याची अधिक शक्यता असते, असेही हे संशोधन सांगते.

हेही वाचा :   

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news