Facts about France : नखरेल, रंगेल पॅरिसनगरी म्हणजे फ्रान्स नव्हे, जाणून घ्‍या या देशाची काही अनोखी वैशिष्ट्ये

Facts about France : नखरेल, रंगेल पॅरिसनगरी म्हणजे फ्रान्स नव्हे, जाणून घ्‍या या देशाची काही अनोखी वैशिष्ट्ये
Published on
Updated on

पॅरिस : नखरेल, फॅशनेबल, रंगेल पॅरिसनगरी म्हणजे सगळा फ्रान्स नव्हे. सीन नदीच्या काठावरील ही नगरी आणि तेथील आयफेल टॉवर जगप्रसिद्ध आहे. मात्र, तरीही फ्रान्सच्या अनेक गोष्टी लोकांना ठावुक नाहीत. फ्रान्स हा युरोपमधील तिसरा सर्वात मोठा देश आहे. फ्रान्सचे एकूण क्षेत्रफळ 5,51,695 चौरस किलोमीटर आहे. हा युरोपमधील सर्वात मोठा देश नसला, तरी क्षेत्रफळाच्या द़ृष्टीने युक्रेन आणि रशियाच्या युरोपीय भागानंतर तिसर्‍या क्रमांकावर आहे. फ्रान्सच्या 31 टक्के क्षेत्रफळावर जंगल आहे आणि एवढ्या मोठ्या वनक्षेत्र असलेला हा युरोपीय संघातील चौथा देश आहे. ( Facts about France )

Facts about France : जगभरातील पर्यटकांसाठी सर्वात आकर्षक देश

स्वीडन, फिनलंड आणि स्पेनचे वनक्षेत्र त्याहून अधिक आहे. त्याचा आकार षटकोनासारखा असल्याने त्याला षटकोनी, असेही म्हणतात. आकडेवारीवरून असे दिसून येते की, जगात सर्वाधिक पर्यटक जर कोणत्या देशाला भेट देत असतील, तर तो फ्रान्स आहे. 2018 मध्ये येथे 8.93 कोटी पर्यटक आले होते. पॅरिसमध्ये नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. कोरोनामुळे पर्यटक येणे बंद झाले होते. मात्र, आता ते पुन्हा सुरू झाले आहे. पर्यटकांच्या बाबतीत बँकॉक आणि लंडन शहरांच्या बाबतीत क्रमांक एक आणि दोन वर आहेत, तर पॅरिस क्रमांक 3 वर येते.

Facts about France :  फ्रेेंच 300 वर्षे इंग्लंडची अधिकृत भाषा राहिली

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, फ्रेेंच 300 वर्षे इंग्लंडची अधिकृत भाषा राहिली आहे. 1066 ते 1362 मधली ही गोष्ट आहे. तेव्हा सर्व राजेशाही, मोठी माणसे आणि अधिकारी फ्रेंच बोलत होते. त्यांच्यापैकी काहींना इंग्रजी येत नसले, तरी त्यांना फ्रेंच नक्कीच येत असे आणि ते बोलतही होते. परंतु, 1362 मध्ये, इंग्लंडच्या संसदेने इंग्रजी कायदा नावाचा कायदा संमत केला, ज्यानंतर इंग्रजी ही इंग्लंडची अधिकृत भाषा बनली.

मृत व्यक्तीशीही लग्न करण्‍यास कायदेशीर मान्‍यता!

फ्रान्स हा एकमेव असा देश आहे जिथे तुम्ही मृत व्यक्तीशीही लग्न करू शकता. हे कायदेशीरद़ृष्ट्या मान्य आहे. परंतु, तुम्ही हे सिद्ध केले पाहिजे की, ज्या मृत व्यक्तीसोबत तुम्हाला लग्न करायचे आहे, त्याला जिवंत असताना तुमच्याशी लग्न करण्याची इच्छा होती. यासाठी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची मंजुरी आवश्यक असते.

अतिरिक्त किराणा सामान-अन्न फूड बँक आणि धर्मादाय संस्थांना द्यावे लागते

फ्रान्समध्ये असा कायदा आहे की, येथील हॉटेल्स आणि सुपरमार्केट आपले न विकलेले अन्न फेकून देऊ शकत नाहीत किंवा नष्ट करू शकत नाहीत. त्यांना त्यांचे अतिरिक्त किराणा सामान आणि अन्न फूड बँक आणि धर्मादाय संस्थांना द्यावे लागते. फेब्रुवारी 2016 मध्ये फ्रान्समध्ये जेव्हा हा कायदा करण्यात आला तेव्हा असे करणारा तो पहिला देश होता.

38,000 हून अधिक कलाकृती असणारे लुव संग्रहालय

जो कोणी फ्रान्स किंवा पॅरिसमध्ये येतो, तो इथल्या लुव संग्रहालयाला भेट द्यायला विसरत नाही. हे कदाचित जगातील एकमेव संग्रहालय आहे, जिथे जास्तीत जास्त लोक भेट देतात. हे पॅरिसच्या मध्यभागी आहे. प्राचीन काळापासून आतापर्यंत 38,000 हून अधिक कलाकृती येथे आहेत. त्यात मोनालिसा, द बेनेस द मिलो यासारख्या प्रसिद्ध चित्रांसह प्रसिद्ध ग्लास पिरॅमिड आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news