‘हा मुस्लिम तरुणींचा अपमान’ : राहुल गांधींच्या कुत्रीला इस्लामिक नाव; AIMIMची टीकेची झोड

‘हा मुस्लिम तरुणींचा अपमान’ : राहुल गांधींच्या कुत्रीला इस्लामिक नाव; AIMIMची टीकेची झोड

पुढारी ऑनलाईन डेस्क : राहुल गांधी त्यांच्या श्वानप्रेमासाठी ओळखले जातात. राहुल गांधी यांनी नुकतेच एक कुत्र्याचे पिलू पाळले असून त्याला नुरी असे नाव ठेवले आहे. पण नुरी हे इस्लामिक असून मुलींना हे नाव दिले जाते, त्यामुळे राहुल गांधी यांनी मुस्लिम तरुणींचा अवमान केला असून त्यांनी मुस्लिम समजाची माफी मागावी अशी मागणी AIMIM पक्षाने केली आहे.
AIMIMचे नेते मोहमद फरहान यांनी केली आहे. (AIMIM criticize Rahul Gandhi over dog name)

फरहान म्हणाले, "मुस्लिम समाजाप्रति गांधी कुटुंबाच्या मनात नकारात्मक वृत्ती आहे. कुत्रीचे नाव नुरी ठेऊन त्यांनी सर्व मुस्लिम महिलांचा, मुलींचा अवमान केला आहे. त्यांचे हे कृत्य निषेधार्ह असून त्यांनी या प्रकरणात मस्लिम समाजाची माफी मागितली पाहिजे." ही बातमी इंडिया टुडेने दिली आहे.

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी जॅक रसेल टेरिअर जातीचे ३ महिन्यांचे कुत्र्याचे पिलू घेतले आहे, त्याचे नाव नुरी असे ठेवले आहे. राहुल यांनी आई सोनिया गांधींना हे कुत्रे भेट दिले आहे. गोव्यातून त्यांनी हे कुत्रे आणले आहे. सोनिया गांधी यांच्याकडे अजून एक कुत्रे असून त्याचे नाव लॅपो असे आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news