राहुल गांधींचे पुन्‍हा धक्‍कातंत्र, थेट हमाल होत वाहिले ओझे..! | पुढारी

राहुल गांधींचे पुन्‍हा धक्‍कातंत्र, थेट हमाल होत वाहिले ओझे..!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेस नेते राहुल गांधी आज ( दि. २१) दिल्‍लीतील आनंद विहार रेल्‍वे स्‍थानकाला भेट देत येथील हमालांना सुखद धक्‍का दिला. त्‍यांच्‍या या धक्‍कातंत्राने सर्वांना चकित केले. मागील काही महिन्‍यांत राहुल गांधी यांनी अनेकवेळा कष्‍टकरी आणि सर्वसामान्‍यांशी संवाद साधत त्‍यांच्‍या जगण्‍यातील संघर्ष जाणून घेतला आहे. ( Rahul Gandhi interacts with porters )

काँग्रेस पक्षाने केलेल्‍या ट्वीटमध्‍ये म्‍हटलं आहे की, राहुल गांधी आज सकाळी आनंद विहार रेल्‍वे स्‍थानकावर आले. यावेळी त्‍यांनी हमालांशी संवाद साधला. या भेटीबाबत काँग्रेस पक्षाच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी आज सकाळी हमालांशी संवाद साधण्‍यासाठी आनंद विहार रेल्वे स्थानकावर आले होते. त्‍यांनी हमालांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍या. तसेच त्‍यांनी हमाल परिधान करत असलेल्‍या लाल शर्ट घालून डोक्‍यावर सामानही उचलले.( Rahul Gandhi interacts with porters )

मागील महिन्यात राहुल गांधींनी दिल्लीच्या आझादपूर मंडीला भेट दिली होती. काँग्रेस पक्षाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी त्यांच्या अचानक भेटीदरम्यान भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांशी संवाद साधताना दिसले होते. त्‍यावेळी टोमॅटोचे भाव गगनाला भिडले होते. या काळात देशातील प्रमुख शहरांमध्ये टोमॅटोचे दर १५० ते २०० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. यापूर्वी त्‍यांनी दुचाकी मॅकेनिकची अचानक भेट घेवून त्‍याच्‍याशी संवाद साधला होता.

हेही वाचा :

 

Back to top button