Instagram Down: जगभरात इन्स्टाग्राम डाऊन; युजर्संनी नोंदवली तक्रार

Instagram Down
Instagram Down

पुढारी ऑनलाईन: मेटा मालकीचे फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म Instagram वापरताना जगभरातील काही युजर्संना अचडणी येत आहे. आज (दि.१८) सकाळी १० वाजल्यापासून इन्स्टाग्रामवरील (Instagram) Reels या ऑप्शन वापरताना युजर्संना समस्या येत आहे. जगभरातील ७८० हून अधिक युजर्संनी यासंदर्भात तक्रार(Instagram Down) नोंदवल्याची माहिती Downdetector ने दिलेल्या अहवालात दिली आहे.

संबंधित समस्या यूएसए आणि जवळपासच्या प्रदेशातील राज्यांना सर्वाधिक जाणवत आहे. परंतु या समस्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. यापूर्वी मार्चमध्ये देखील मेटाच्या मालकीच्या इन्स्टाग्राम प्लॅटफटर्मला अशा समस्यांचा सामना करावा लागला होता. काही युजर्संनी ट्विटवरून देखील या समस्येसंदर्भातील तक्रार (Instagram Down) केली आहे.

इन्साटग्राम युजर्संनी दिलेल्या माहितीमध्ये प्लॅटफॉर्मवर लॉग इन करणे, फीडमध्ये प्रवेश करणे, स्टोरी पाहणे आणि पोस्ट करणे आणि बरेच काही करण्यात अडचणी येत आहेत, असल्याचे करण्यात आलेल्या तक्रारीत (Instagram Down) म्हटले आहे, असे Downdetector ने दिलेल्या अहवालात सांगितले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news